Vinod Kambli: मुंबई: एक काळ असा होता की सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विनोद कांबळी (Vinod Kambali) या जोडीची चर्चा मुंबईमार्गे भारतभर आणि नंतर जगभर पसरली होती. शालेय क्रिकेटपासून ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत ही जोडी एकत्र होती. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात झाली तेव्हा कांबळीने आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांना चकित केले होते. पण त्यानंतर सचिनने हळूहळू वेग पकडला आणि क्रिकेटविश्वात आपला दबदबा निर्माण केला. तर दुसरीकडे विनोद कांबळीच्या कारकिर्दीला मात्र त्याच्या बेशिस्त वर्तनामुळे अचानक ब्रेक लागला. आज परिस्थिती अशी आहे की, या माजी क्रिकेटपटूची आर्थिक स्थिती चांगली नाही आणि तो पैशासाठी क्रिकेटशी संबंधित कोणतेही काम करण्यास तयार आहे. (former cricketer vinod kambli said i need work i also have a family)
'मिड-डे'ला दिलेल्या खास मुलाखतीत विनोद कांबळीने आपली भूमिका उघडपणे सर्वांसमोर मांडली. क्रिकेटपासून ते चित्रपट आणि छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोपर्यंत प्रत्येक गोष्टीत नशीब आजमावणारा माजी क्रिकेटपटू म्हणतो की, त्याला कुटुंबाचं पालनपोषण करायचं असल्याने त्याला कामाची गरज आहे. कांबळीने या मुलाखतीत सांगितले की, त्याच्या कमाईचा एकमेव स्त्रोत बीसीसीआयकडून मिळणारे 30 हजार रुपये पेन्शन एवढाच आहे. त्यामुळे आता त्याला कामाची गरज आहे.
अधिक वाचा: BCCI पुढे ICC झुकली, जोपर्यंत IPL आहे तोपर्यंत दुसरा आंतरराष्ट्रीय सामना नाही होणार
नेरुळ येथील तेंडुलकर ग्लोबल मिडलसेक्स अकादमीच्या मुलांना प्रशिक्षण देत असताना त्यांने प्रशिक्षणाची जबाबदारी घेतली. पण तो म्हणतात की नेरळ घरापासून फार लांब पडायचे. पहाटे ५ वाजता उठून स्टेडियमला जाण्यासाठी खूप ताण पडायचा. दरम्यान, त्याने बीसीसीआयचे आभार देखील मानले आहेत. कारण निवृत्त क्रिकेटपटू म्हणून मिळणारे पेन्शन यावरच तो आपलं घर चालवत आहे.
तो पुढे म्हणाला, "मला अशा नोकऱ्या हव्या आहेत जिथे मी तरुणांसोबत काम करू शकेन. मला माहित आहे की मुंबईने अमोल मजुमदारला प्रशिक्षक म्हणून कायम ठेवलं आहे. पण माझी गरज पडल्यास मी त्यासाठी पूर्णपणे तयार आहे. आम्ही एकत्र खेळलो आहोत."
अधिक वाचा: Rohit Sharma: रोहितच्या नावावर हा लाजिरवाणा रेकॉर्ड, लॉर्ड्समध्ये असे करणारा दुसरा भारतीय कर्णधार
कांबळी पुढे म्हणाला, "मी एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) कडे मदत मागितली आहे. मी सीआयसीमध्येही आलो जिथे मानधनाची नोकरी होती. मी एमसीएला विनंती केली की मला माझ्या कुटुंबाचीही काळजी घ्यायची असल्याने मला काही काम द्या. मग ते वानखेडे स्टेडियम किंवा बीकेसी कुठेही असो. दोन्ही ठिकाणी मी काम करण्यास तयार आहे. मुंबई क्रिकेटने मला खूप काही दिले आहे. या खेळाने मला माझं आयुष्य दिलं आहे."
अधिक वाचा: आता भारतीय महिलाही 'पॉवरफुल', शरीरसौष्ठव स्पर्धेत भारतीय संघात तब्बल 19 महिला
कांबळीने असेही सांगितले की, तो व्यसनाधीन नाही, कधीकधी थोडीशी पितो. तो म्हणतो - कोण करत नाही. जर एखाद्या ठिकाणी काम असेल आणि तेथे नियमानुसार तुम्ही दारू पिऊ शकणार नसाल तर मी ते तात्काळ दारु सोडून देईन.