T20 World Cup: या इंग्रज दिग्गजाने टीम इंडियाच्या जखमेवर चोळले मीठ

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 11, 2022 | 13:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

Team India: टी20 वर्ल्ड कप 2022च्या सेमीफायनल सामन्यात इंग्लंडच्या संघाने भारताला 10 विकेटनी हरवत त्यांचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले. टीम इंडियाला ऑस्ट्रेलियावरून आयसीसीची ही ट्रॉफी न घेता परतावे लागले. 

team india
या इंग्रज दिग्गजाने टीम इंडियाच्या जखमेवर चोळले मीठ 
थोडं पण कामाचं
  • नासिर हुसैनने टीम इंडियाबाबत अशी कमेंट केली आहे ज्यामुळे भारतीय चाहते प्रचंड चिडले आहेत.
  • नासिर हुसैनने टीम इंडियावर टीका करताना भारतीय संघ जुन्या काळचा पावर प्ले क्रिकेट खेळत आहे.
  • एक चांगली फलंदाजी लाईन अप असतानाही, स्पर्धेत चांगली सुरूवात केलेली नसतानाही भारताच्या सातत्याच्या समस्येने त्यांना पुन्हा निराश केले.

मुंबई: टी20 वर्ल्ड कप 2022च्या(t-20 world cup 2022) सेमीफायनल(semifinall) सामन्यात इंग्लंडच्या(england) संघाने भारताला(india) 10 विकेटनी हरवत त्यांचे वर्ल्डकप खिताब जिंकण्याचे स्वप्न मोडले. टीम इंडियाला(team india) ऑस्ट्रेलियावरून(australia) रिकाम्या हातीच परतावे लागले. सेमीफायनल सामन्यात वाईट पद्धतीने पराभव पत्करल्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैनने टीम इंडियाच्या जखमेवर मीठ चोळले. former england captain Nasir Hussain statement about team india 

अधिक वाचा - या 5 गोष्टींचा मुलांवर होतो विपरित परिणाम...टाळा या चुका

या दिग्गज इंग्रजाने टीम इंडियाच्या जखमेवर चोळले मीठ

नासिर हुसैनने टीम इंडियाबाबत अशी कमेंट केली आहे ज्यामुळे भारतीय चाहते प्रचंड चिडले आहेत. नासिर हुसैनने टीम इंडियावर टीका करताना भारतीय संघ जुन्या काळचा पावर प्ले क्रिकेट खेळत आहे. एक चांगली फलंदाजी लाईन अप असतानाही, स्पर्धेत चांगली सुरूवात केलेली नसतानाही भारताच्या सातत्याच्या समस्येने त्यांना पुन्हा निराश केले. भारताला पॉवरप्लेमध्ये केवळ 1 बाद 38 धावा केल्या तर इंग्लंडने बिनबाद 63 धावा केल्या होत्या. 

भारताच्या चाहत्यांना येईल राग

नासिक हुसैनच्या स्काय स्पोर्ट्सवर म्हटले, जर तुम्ही इंग्लंडच्या पहिल्या सहा ओव्हर पाहिल्या तर भारताची एक मोठी चूक घडली. हेल्स आणि बटलर तसेच घेडले जसे ते खेळत होते आणि भारत आजही जुन्या काळातील पॉवरप्ले क्रिकेट खेळत आहे. माजी कर्णधार मायकेल एथरटनने हुसैनच्या विचारांशी सहमती दर्शवली तसच भारताच्या गोलंदाजांवर जोरदार टीका केली.

 

इयॉन मॉर्गनने केले तिखट विधान

इंग्लंडचा माजी कर्णधार इयॉन मॉर्गनने बटलरच्या संघाचे भारताला हरवल्याबद्दल कौतुक केले. इंग्लंडने एका चांगल्या भारतीय संघाला सामान्य बनवले आणि हे करणे कठीण आहे. यात चांगल्या पद्धतीने योजना करणे आणि लागू करणे  समाविष्ट आहे. 

अधिक वाचा - तुरुंगातून बाहेर येताच फडणवीसांचं कौतुक, राऊतांच्या मनात काय

रविवारी सर्वात  मोठा सामना

इयॉन मॉर्गनने सांगितले, इंग्लंड संघाने टीम इंडियाला सामान्य संघ बनवून टाकले. मोठ्या सामन्यात टीम इंडिया दोन वेगवेगळे संघ दिसले. अॅलेक्स हेल्स आणि जोस बटलरने शानदार फलंदाजी केली. मी संघासाठी, जोससाठी आणि कोच मॅथ्यू मॉटसाठी खूप खुश आहे. आता रविवारचा सामना मोठी संधी आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी