Team India: या क्रिकेटरच्या वडिलांना केली अटक, महाराष्ट्र बँकेत केला घोटाळा

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 07, 2022 | 13:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

Team India: एका भारतीय क्रिकेटरच्या वडिलांना बँकेत फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. २०१४मध्ये केस दाखल झाल्यानंतर या खेळाडूचे वडील फरार होते. 

arrest
Team India: या भारतीय क्रिकेटरच्या वडिलांना झाली अटक  
थोडं पण कामाचं
  • पोलिसांनी बँक फसवणूक प्रकरणा माजी क्रिकेटर नमन ओझाचे वडील वीके ओझा यांना अटक केली आहे.
  • मुलताई पोलिसांनी सोमवारी वीके ओझा यांना कोर्टात सादर केले यादरम्यान नमन ओझाही उपस्थित होता.
  • बँक ऑफ महाराष्ट्रच्या घोटाळ्या प्रकरणात २०१३मध्ये तब्बल सव्वा कोटी रूपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले होते

मुंबई: पोलिसांनी नुकतेच एका भारतीय खेळाडूच्या वडिलांना अटक(arrest) केली आहे. या खेळाडूच्या वडिलांनी मॅनेजर पदावर असताना सव्वा कोटी रूपयांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. कोर्टाने त्यांना एक दिवसाच्या पोलीस रिमांडवर पाठवले आहे. हा खेळाडू टीम इंडियासाठी तीनही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. former team india cricketer naman ojha father arrest in fraud case

अधिक वाचा - ऋषभ पंतनं ठेवलं बापाच्या पावलावर पाऊल

 या खेळाडूच्या वडिलांना अटक

पोलिसांनी बँक फसवणूक प्रकरणा माजी क्रिकेटर नमन ओझाचे वडील वीके ओझा यांना अटक केली आहे. मुलताई पोलिसांनी सोमवारी वीके ओझा यांना कोर्टात सादर केले यादरम्यान नमन ओझाही उपस्थित होता. बँक ऑफ महाराष्ट्रच्या घोटाळ्या प्रकरणात २०१३मध्ये तब्बल सव्वा कोटी रूपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी २१४मध्ये नमनच्या वडिलांविरोधात केस दाखल करण्यात आली होती. 

२०१४ पासून होते फरार

नमन ओझाचे वडी वीके ओझा यांच्यावर कलम 409, 420, 467, 468, 471, 120 बी, 34 आणि आयटी कायद्याचे कल  65,66 अंतर्गत केस दाखल होत्या. २०१४मध्ये केस दाखल झाल्यानंतर वीके ओझा हे फरार होते. पोलीस गेल्या ८ वर्षांपासून त्यांचा शोध घेत होती. एसडीओपी मुलताई नम्रता सोंधिया यांनी सांगितले की फसवणूक प्रकरणात फरार असलेले आरोपी वीके ओझा यांना अटक केली आहे. ते क्रिकेटर नमन ओझाचे वडील आहेत. 

अधिक वाचा - ५ जूनपासून शनि चालतोय उलटी चाल, या लोकांची वाढणार डोकेदुखी

अन्य आरोपींनाही केली अटक

बँक ऑफ महाराष्ट्र साखा जौळखेडामधील पदस्थ बँक मॅनेजर अभिषेक रत्नम, वीके ओझा,सह इतर अधिकाऱ्यांनी खोटी नावे आणि फोटोच्या आधारावर किसान क्रेडिट कार्ड बनवून बँकेतून पैसे काढले होते. यात तत्कालीन बँक मॅनजर अभिषेक रत्नम, नीलेश छलोत्रेसह इतर जणांना आधीच अटक झाली होती. प्रसिद्ध क्रिकेटर नमन ओझाने भारतासाठी एक कसोटी, एक वनडे आणि दोन टी-२० सामने खेळले आहेत. त्याने ११३ आयपीएल सामनेही खेळले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी