लॉकडाऊनचं उल्लंघन: टीम इंडियाच्या माजी क्रिकेटरची कार पोलिसांनी केली जप्त

Car seized for lockdown violation: भारताचा माजी टेस्ट क्रिकेटर रॉबिन सिंग याला लॉकडाऊनचं उल्लंघन करणं चांगलंच महागात पडलं आहे. पाहूयात काय घडलं आहे नेमकं...

Police
फोटो सौजन्य: iStockImages (प्रातिनिधीक फोटो)  

थोडं पण कामाचं

  • टीम इंडियाचा माजी क्रिकेटर रॉबिन सिंग याची कार जप्त 
  • लॉकडाऊनचं उल्लंघन केल्याप्रकरणी चेन्नई पोलिसांची कारवाई 
  • कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत तमिळनाडू देशात तिसऱ्या क्रमांकावर 

चेन्नई: टीम इंडियाचा माजी ऑल राऊंडर रॉबिन सिंग (Robin Singh) याने लॉकडाऊनचं उल्लंघन केलं आणि त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेल्या लॉकडाऊन नियमांचे (Lockdown Violation) पालन न केल्याने माजी क्रिकेटर रॉबिन सिंग याची कार पोलिसांनी जप्त केली आहे. चेन्नई पोलिसांनी (Chennai Police) ही कारवाई केली आहे. रॉबिन सिंग याची गाडी जप्त केल्यानंतर पोलिसांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, रॉबिन सिंग येथे भाजी खरेदीसाठी आला होता. चेन्नईत लागू असलेल्या लॉकडाऊनच्या नियमांनुसार, अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी तुम्ही घरापासून २ किलोमीटरपर्यंतच्या परिसरातच प्रवास करु शकता. मात्र, रॉबिन सिंग यांनी या नियमांचं उल्लंघन केल्याने पोलिसांनी कारवाई केली आहे.

...म्हणून रॉबिन सिंगची कार जप्त

चेन्नईमध्ये १९ जूनपासून पुन्हा एकदा लॉकडाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आल्याची घोषणा केली आहे. हा लॉकडाऊन १२ दिवसांसाठी लागू करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉबिन सिंग हा शनिवारी इस्ट कोस्ट रोड (ईसीआर) येथून सकाळी येत होता. त्यावेळी तपासणी दरम्यान आढळले की, त्याच्याकडे नाही ई-पास होता आणि गाडीमधून प्रवास करण्याचे कोणतेही आपत्कालीन परिस्थितीचे कारण होते. यामुळे त्याची कार आम्ही जप्त केली. 

चैन्नईत कोरोनाचे थैमान 

तमिळनाडूची (Tamil Nadu) राजधानी चेन्नईसह संपूर्ण राज्यात कोरोनाने (Corona) अक्षरश: थैमान घातले आहे. चेन्नईत आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४५८१४ इतकी झाली आहे. यापैकी ६६८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २६,४७४ कोरोना बाधित रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि सध्य स्थितीत १८,६७३ कोरोना बाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चेन्नईत कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर हा ५८.१८ टक्के इतका आहे. तर कोरोनामुळे १.४७ टक्के रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोना बाधितांची एकूण संख्या लक्षात घेता तमिळनाडू देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची संख्या आहे. त्यानंतर दिल्लीमध्ये आणि नंतर तिसऱ्या क्रमांकावर तमिळनाडू आहे. देशातील महत्वाच्या शहरांमध्येही चेन्नईत कोरोना बाधितांची संख्या ही खूप आहे. कोरोना बाधितांच्या संख्येनुसार चेन्नईचा देशात तिसरा क्रमांक आहे. तमिळनाडूतील एकूण रुग्ण संख्येच्या ६८ टक्के बाधित हे केवळ चेन्नईतच आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी