WWE मधील स्टार खेळाडू भर समुद्रातून बेपत्ता, तीन दिवसापासून शोध सुरु

Former WWE star Shad Gaspard is missing: WWE मधील माजी स्टार खेळाडू शेड गॅसपर्ड हा गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता आहे. भर समुद्रातून शेड गायब झाल्याने त्याचे कुटुंबीय चिंतेत आहेत.  

former wwe star shad gaspard is missing from the sea the search began three days ago
WWE मधील स्टार खेळाडू भर समुद्रातून बेपत्ता, तीन दिवसापासून शोध सुरु   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • WWE मधील स्टार खेळाडू मागील तीन दिवसांपासून बेपत्ता
  • समुद्रात मुलासोबत पोहत असताना अचानक बुडाला
  • मुलाला वाचविण्यात येत, शेड गॅसपार्डचा अद्यापही शोध सुरुच

कॅलिफोर्निया: WWE या प्रसिद्ध टीव्ही शोमधील स्टार रेसलर आणि अभिनेता शेड गॅसपार्ड हा १७ मे रोजी कॅलिफोर्नियातील एका समुद्रकिनाऱ्यावरुन अचानक गायब झाला आहे. तो आपल्या मुलासह समुद्रात आंघोळ करीत होता मात्र अचानक उसळलेल्या मोठ्या लाटांमध्ये हे दोघेही अडकले. यावेळी त्याच्या  मुलाला वाचविण्यात यश आले आहे. पण शेड अद्यापही बेपत्ता आहे. स्थानिक पोलीस तीन दिवसांपासून त्याचा शोध घेत आहे पण अद्यापपर्यंत त्याचा काही शोध लागलेला नाही. जिथं ही घटना घडली आहे तिथून ७० नॉटिकल मैल लांब समुद्री भागात त्याचा शोध सुरु आहे. परंतु सध्या तरी त्याच्या विषयी कोणताही माहिती मिळालेल नाही. 

कोरोनामुळे कॅलिफोर्नियात देखील लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच यात सूट देण्यात आली होती. त्यामुळे ३९ वर्षीय गॅसपार्ड व्हेनिसच्या मिरिना डेल रे बीचवर कुटुंबासमवेत गेला होता. तो किनाऱ्यापासून ५० यार्ड दूर पोहत होत. लॉस एंजेलिस पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांना लाइफगार्ड्सनी शेवटचं पाहिलं तेव्हा एक जोरदार  लाट आली आणि नंतर तो त्या लाटेसह वाहून गेला.  तेव्हापासून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. त्याला शोधण्यासाठी पोलिस सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.

दरम्यान, शेड सारखा खेळाडू भर समुद्रातून गायब झाल्यामुळे आता चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे त्याच्या कुटुंबीयांना देखील मोठा धक्का बसला आहे. तसेच शेडचे चाहते देखील त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत. 

गॅसपार्डला संपूर्ण जगात डब्ल्यूडब्ल्यूई या टीव्ही शोमुळे बरीच प्रसिद्धी मिळाली. २००६ मध्ये त्याने क्राइम टाइम टीमसह सुरुवात केली होती. चार वर्षांनंतर तो इथून अभिनयाकडे वळला आणि बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केलं. तो हॉलिवूडमधील 'थिंक लाईक अ मॅन टू' आणि 'द लास्ट शार्कनाडो' या  चित्रपटात दिसला होता.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी