T-20 Semi Final Analysis: ‘या’ चौघांना संधी दिली असती तर बदललं असतं नशीब, टीम इंडियाच्या पराभवानंतर जोरदार चर्चा

टीम इंडियाकडून भारतासह जगभरातील अनेक क्रिकेट चाहत्यांच्या अपेक्षा होत्या. तब्बल 11 वर्षानंतर आता टीम इंडिया पुन्हा एकदा विश्वचषक जिंकेल, असं सर्वांना वाटत होतं. मात्र सर्वांचाच हिरमोड झाला. या सामन्यानंतर आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

T-20 Semi Final Analysis
‘या’ चौघांना संधी दिली असती तर बदललं असतं नशीब  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • टीम इंडियाच्या पराभवानंतर सुरू झाली समीक्षा
  • दिग्गज खेळाडूंना संधी न मिळाल्याची चर्चा
  • काही खेळाडूंच्या समावेशानं बदललं असतं चित्र

T-20 Semi Final Analysis: टी-20 वर्ल्डकपच्या (T-20 World Cup) सेमीफायनलमध्ये (Semi Final) भारताचा दारुण पराभव झाला. इंग्लंडने दुसऱ्या इनिंगमध्ये भारतीय गोलंदाजांची धुलाई करत सहजरित्या विजय संपादन करून फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. ॲलेक्स हेल्स आणि जोस बटलर यांच्या जोडीनं शतकी भागीदारी करत 10 विकेट्सनी टीम इंडियाचा दारुण पराभव केला. रोहित शर्मा आणि लोकेश राहुलसारखे दिग्गज खेळाडू या मोठ्या सामन्यात काहीच कमाल दाखवू शकले नाहीत. टीम इंडियाकडून भारतासह जगभरातील अनेक क्रिकेट चाहत्यांच्या अपेक्षा होत्या. तब्बल 11 वर्षानंतर आता टीम इंडिया पुन्हा एकदा विश्वचषक जिंकेल, असं सर्वांना वाटत होतं. मात्र सर्वांचाच हिरमोड झाला. या सामन्यानंतर आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. जर भारताच्या चार महत्त्वाच्या खेळाडूंना या सामन्यात संधी मिळाली असती, तर आपलं भविष्य बदललं असतं, असं विश्लेषण काही तज्ज्ञ करत आहेत. 

यजुवेंद्र चहल

यजुवेंद्र चहलला एकाही सामन्यात संधी न देणं, ही भारतीय संघाची सर्वात मोठी चूक होती. चहल हा फिरकीचा जादूगार आहे. सेमीफायनलच्या सामन्यात इंग्लंडचे दोन स्पीनर्स प्रभावशाली ठरले. त्यामुळे चहलला न खेळवण्याच्या निर्णयावर आता जोरदार टीका होत आहे. आदिल राशिद आणि लियाम लिविंगस्टोन या खेळाडूंच्या फिरकीला मैदानावर चांगलीच साथ मिळाली. त्यामुळे चहलला न खेळवण्याचा रोहित शर्माचा निर्णय चुकीचा होता, अशी टीका आता होऊ लागली आहे. 

अधिक वाचा - IND vs NZ: T20 वर्ल्ड कपमधील पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय, द्रविड ॲन्ड कंपनीला दिला ब्रेक

हर्षल पटेल

कर्णधार रोहित शर्माने पूर्ण टूर्नामेंटमध्ये हर्षल पटेलला एकही संधी दिली नाही. मधल्या षटकांमध्ये विकेट घेण्याची क्षमता असणाऱ्या हर्षल पटेलला बाकावर बसवून टीम इंडियाने संधी गमावल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. हर्षलने आपल्या कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. यंदाच्या आयपीएल सामन्यांमध्येही त्याने आपल्या कामगिरीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनीदेखील सामन्यातून हर्षल पटेलला वगळल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं होतं आणि त्याला संघात घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र प्रत्यक्षात तसं घडलं नाही. अर्थात, अक्षर पटेलला यापूर्वी अनेकदा संधी देऊनही त्याने निराशा केली होती. त्यामुळे त्याला बाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

इशान किरन

या संपूर्ण मालिकेत के.एल. राहुल फ्लॉप झाला. इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलच्या सामन्यात तर तो केवळ 5 धावा काढून बाद झाला. इशान किरन हा त्याऐवजी चांगला पर्याय ठरू शकला असता. मात्र त्याची या मालिकेसाठी निवडच करण्यात आली नाही. इशानने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत धमाकेदार कामगिरी केली होती. 

अधिक वाचा - टॉप प्लेयर्स ब्रेक घेतात, नवे खेळाडू येतात मात्र....सेहवागने केले सवाल

संजू सॅमसन

धडाकेबाज खेळाडून संजू सॅमसनला या मालिकेत न खेळवण्याचा निर्णयही टीम इंडियाला महागात पडल्याची चर्चा आहे. कट, पूल, स्ट्रेट ड्राईव्ह मारण्याची उत्तम कला असणारा आणि चौफेर फटकेबाजी करू शकणारा हा खेळाडू टीम इंडियासाठी वरदान ठरू शकला असता. मात्र त्याला तशी संधीच मिळाली नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी