T20 WC: टी-२० वर्ल्डकप, कोहलीबाबत गंभीरने केले हे मोठे विधान

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 19, 2021 | 13:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरच्या मते विराट कोहलीच्या नजरा २०२१ टी-२० वर्ल्डकपवर असल्या पाहिजेत. कारण एक कर्णधार म्हणून त्याची ही पहिली आणि शेवटची स्पर्धा आहे. 

gautam gambhir
T20 WC: टी-२० वर्ल्डकप, कोहलीबाबत गंभीरने केले हे मोठे विधान 
थोडं पण कामाचं
  • गौतम गंभीरने म्हटले की कर्णधार विराट कोहलीच्या नजरा यूएईमद्ये खेळवल्या जाणाऱ्या टी-२० वर्ल्डकप विजयावर असल्या पाहिजेत.
  • मला विश्वास आहे की भारतीय संघ या स्पर्धेत नक्कीच चांगली कामगिरी करेल.
  • विराट कोहलीची कर्णधार म्हणून शेवटची स्पर्धा आहे त्यामुळे यात विजय मिळवून एक विजयी कर्णधार म्हणून निवृत्त होईल. 

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरने म्हटले की कर्णधार विराट कोहलीच्या नजरा यूएईमद्ये खेळवल्या जाणाऱ्या टी-२० वर्ल्डकप विजयावर असल्या पाहिजेत. मला विश्वास आहे की भारतीय संघ या स्पर्धेत नक्कीच चांगली कामगिरी करेल. कारण २००७ नंतर भारताने टी-२० वर्ल्डकप खिताब जिंकलेला नाही. एक कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा पहिला आणि शेवटचा वर्ल्डकप आहे. 

गंभीरने स्टार स्पोर्ट्सला सांगिले की मला विश्वास आहे की विराट कोहली आणि टीम या स्पर्धेत चांगली कामगिरी करतील. कारण टी-२० वर्ल्डकपचा खिताब जिंकून १४ वर्षे झाली आहेत. विराट कोहलीची कर्णधार म्हणून शेवटची स्पर्धा आहे त्यामुळे यात विजय मिळवून एक विजयी कर्णधार म्हणून निवृत्त होईल. 

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी टी-२० वर्ल्डकपमध्ये मेंटाँर म्हणून टीम इंडियाशी जोडले जाण्याबाबत गंभीर म्हणाला, धोनी आपले अनुभव त्या खेळाडूंसोबत शेअर करणार जे पहिल्यांदाच या इव्हेंटमध्ये भाग घेणार आहेत. गंभीर म्हणाला, जे युवा क्रिकेटर पहिल्यांदा वर्ल्डकपमध्ये खेळतील त्यांच्यासोबत अनुभव शेअर करणे महत्त्वाचे असेल. कारण वर्ल्डकप एकदम वेगळा असतो. धोनी आपले अनुभव या क्रिकेटर्ससोबत शेअर करेल. 

ICC टी20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन , शार्दुल ठाकुर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार और मोहम्मद शमी. 

स्टँडबाय खेळाडू - श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि अक्षऱ पटेल. 

टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये हा बदल

टी२० वर्ल्डकपसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक मोठा बदल केला आहे. संघात वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरला मुख्य टी-२० संघाा भाग बनवण्यात आला आहे. तर आधी सामील करण्यात आलेल्या अक्षर पटेलला १५ सदस्यीय संघातून बाहेर काढून स्टँड बाय खेळाडूंना या यादीत सामील केले आहे. संघात ऑलराऊंडर हार्दिक पांड्या कायम आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी