Gautam gambhir:ISIS काश्मीरकडून भाजप खासदार गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 24, 2021 | 13:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

Death Threats: अधिकाऱ्यांनी सांगितले की सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे. याशिवाय सुरक्षेसाठी गंभीरच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 

gautam gambhir
ISIS काश्मीरकडून गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी 
थोडं पण कामाचं
  • सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
  • सुरक्षेसाठी गंभीरच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 
  • यासोबतच जीवे मारण्याची धमकी देणारा ई मेलही शेअर करण्यात आला आहे.

मुंबई: ईस्ट दिल्ली निर्वाचन क्षेत्रातून भाजप खासदार आणि माजी क्रिकेटर गौतम गंभीरला(gautam gambhir) जीवे मारण्याची धमकी दिली आहे. खरंतर, गंभीरने दिल्ली पोलिसांशी(delhi police) संपर्क केला आणि सांगितले की ISIS कश्मीरने(kashmir) जीवे मारण्याची धमकी दिली आहे. डीससीपी सेंट्रल श्वेता चौहानने सांगितले की या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सुरक्षेसाठी गंभीरच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. gautam gambhir got death threat from isis kashmir

ईमेलही शेअर केला

यासोबतच जीवे मारण्याची धमकी देणारा ई मेलही शेअर करण्यात आला आहे. ईमेल पाठवणाऱ्याचे नाव ISIS काश्मीर आहे. मेल मिळाल्यानंतर घराच्या बाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. क्रिकेटर ते राजकारणी बनलेला गंभीर अनेकदा आपल्या वादग्रस्त विधानासाठी ओळखला जातो. प्रत्येक गंभीर मुद्द्यावर आपले मत व्यक्त करत असतो. 

गंभीरचे संघाबद्दल विधान

टी-२० वर्ल्डकपमध्ये सलगच्या दोन पराभवांमुळे भारताचा सेमीफायनलचा मार्ग चुकला. यावरून माजी क्रिकेटर गौतम गंभीरने टीम इंडियावर जोरदार टीका केली होती. 

गंभीरने काढला राग

भारताचा न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरने कोहलीवर जोरदार टीकास्त्र सोडले. तो म्हणाला, कोहलीकडे प्रतिभा आहे मात्र आयसीसी स्पर्धेत मोठ्या नॉकआऊट सामन्यांमध्ये जिंकण्यासाठी त्याच्यात आत्मविश्वासाची कमतरता आहे. आयसीसी वर्ल्डकपमध्ये भारत दबावात आल्यानंतर पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धचे सामने हरला. यावर गंभीर म्हणाला, भारतीय संघात टॅलेंटची कमतरता नाही मात्र महत्त्वाचे सामने जिंकण्यासाठीचा आत्मविश्वास कमी आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी