मुंबई: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी(indian cricket fans)a एक चांगली बातमी समोर आली आहे. टीम इंडियामधून(team india) रिटायरमेंट(retirement) घेतलेला एक खेळाडू ४ वर्षांनी मैदानावर परतत आहे. हा खेळाडू २००७ टी-२० वर्ल्डकप(world cup) आणि २०११ वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा भाग होता. इतकंच नव्हे तर टीम इंडियाच्या विजयात त्याची भूमिका मोलाची होती. दरम्यान, आता हा खेळाडू एका टी-२० लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.याचे नाव आहे लीजेंड्स लीग क्रिकेट. Gautam Gambhir will played in legends cricket league
अधिक वाचा -१.३५ कोटी महिलांना मिळणार मोफत स्मार्टफोन
लीजेंड्स लीग क्रिकेटचा दुसरा हंगाम १७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या हंगामात भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर खेळताना दिसणार आहे. गौतम गंभीर लीजेंड्स लीग क्रिकेटच्या दुसऱ्या हंगामात खेळणार असल्याचा दुजोरा दिला आहे. गौतम गंभीरा मोठ्या सामन्यातील खेळाडू म्हटले जाते. त्याने क्रिकेटला बायबाय करत राजकारणात पाऊल ठेवले होते. यानंतर आता तो पहिल्यांदा मैदानावर खेळताना दिसणार आहे.
गौतम गंभीरने लीजेंड् लीग क्रिकेटद्वारे जारी केलेल्या प्रेस रिलीजमधील एका विधानात म्हटले की, मला हे सांगताना आनंद होत आहे की मी आगामी १७ सप्टेंबरला होणाऱ्या आगामी लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी कमिट केले आहे. मी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर उतरण्यास उत्सुक आहे. वर्ल्ड क्रिकेटच्या चमक-धमकसह पुन्हा एकदा खांद्याला खांदा लावून चालणे हे माझ्यासाठी सौभाग्याचे तसेच सन्मानाची गोष्ट असेल. तर दुसरीकडे लीगचे सीईओ रमन रहेजाने गंभीरच्या खेळण्याबाबत म्हटले, क्रिकेटच्या मैदानावरील गंभीरते योगदान कोण विसरेल. गंभीरने भारताला वर्ल्डकप विजेता बनवले आहे. गंभीरच्या येण्याने लीजेंड्स लीग क्रिकेटचा अनुभव शानदार असणार आहे.
२०११च्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया चॅम्पियन बनली होती. या वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारतासाठी सर्वाधिकधावा गौतम गंभीरने केल्या होत्या. त्याने शेवटच्या सामन्यात ९७ धावांची खेळी केली होती. २००७च्या टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये गौतम गंभीरने ७५ धावांची खेळी केली होती.
अधिक वाचा - विमानाने जाऊन चोरी करणारी महिला गजाआड
या लीजेंड्स क्रिकेटची सुरूवात १६ सप्टेंबरमध्ये इंडिया महाराजा विरुद्ध वर्ल्ड जायंट्स यांच्यातील एका स्पेशल सामन्याद्वारे होणार आहे. हा सामना भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने खेळवला जाणार आहे.