FIFA World Cup 2022: 44 वर्षानंतर वर्ल्डकपमध्ये घडलेय हे....

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 24, 2022 | 14:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

youngest scorer in world cup history: स्पेनचा मिडफिल्डर गावीने बुधवारी कोस्टा रिकाविरुद्ध गोल करत आपल्या नावे आणखी एक रेकॉर्ड केला. 

gavii
FIFA World Cup 2022: 44 वर्षानंतर वर्ल्डकपमध्ये घडलेय हे.... 
थोडं पण कामाचं
  • स्पेनने वर्ल्डकपमध्ये कोस्टा रिकाला 7-0 अशी मात दिली.
  • गावीने 74व्या मिनिटाला गोल करत आपले नाव रेकॉर्डबुकमध्ये दाखल केले. 
  • पेलेनंतर गावी वर्ल्डकपमध्ये गोल करणारा तरूण खेळाडू बनला. 

दोहा: स्पेनचा(spain) मिडफिल्डर गावी(midfielder gavi) वर्ल्डकपच्या इतिहासात गोल करणारा तिसरा सगळ्यात तरूण खेळाडू बनला आहे. 1958मध्ये ब्राझीलचे महान खेळाडू पेले(pele) यांच्यानंतर सगळ्यात तरूण फुटबॉलर(youngest scorer) बनला आहे. गावीने सामन्याच्या 74व्या मिनिटाला गोल केला. स्पेनने बुधवारी कोस्टारिकाला एकतर्फी सामन्यात 7-0 असे हरवले. gavi became third youngest scorer in world cup history

अधिक वाचा - सरनाईकांनी 75 तोळे सोनं तुळजाभवानी मातेला केलं अर्पण

जेव्हा गावी मैदानात सामन्याच्या सुरूवात करण्यास उथरला तेव्हा तो प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्पेनचे प्रतिनिधित्व कऱणारा सगळ्यात तरूण(18 वर्षे 110 दिवस) खेळाडू बनला होता. गावीने एक अनुवादक जाहीर केले त्यात तो म्हणाला, मी या वयात येथे पोहोचण्याचे स्वप्न कधीच पाहिले नव्हते. मी येथे येऊन खूप खुश आहे. हे केवळ पहिले पाऊल आहे. मला सातत्याने चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. 

1958मध्ये ब्राझीलने फायनलमध्ये स्वीडनला मात दिली होती तेव्हा पेलेने 17 वर्ष 249 दिवस इतके वय असताना गोल केला होता. वर्ल्डकपच्या क्वार्टरफायनलमध्ये गोल करत त्यांनी सगळ्यात युवा स्कोरर होण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे केला होता. मेक्सिकोच्या मॅन्युएल रोरास दुसरा तरूण स्कोरर आहे. त्याने 1930मध्ये 18 वर्षे 93 दिवस इतके वय असताना गोल केला होता. तर स्पेनचा गावी 18 वर्षे 110 दिवस या वयात गोल करत तिसरा तरूण स्कोरर बनला आहे. 

गावी म्हणाला, हा जबरदस्त सामना होता. आम्ही पहिल्याही मिनिटापासून सामना जिंकण्याचा प्रयत्न केला आणि मी खूप खुश आहे. आता मला पुढच्या सामन्याची प्रतीक्षा आहे. आज आम्ही सगळ्यांनीच चांगली कामगिरी केली. मी सगळ्यांसाठी खुश आहे. 

अधिक वाचा - औरंगाबादमध्ये भीषण अपघात, तीन सख्ख्या भावंडांचा मृत्यू

स्पेनसाठीही हा विजय रेकॉर्डनी भरलेला राहिला. स्पेनने रेकॉर्ड केला आणि प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करण्याची संधी दिली नाही. 1966नंतर वर्ल्डकपमध्ये स्पेनने 81.3 टक्के बॉल आपल्या ताब्यात ठेवला. हा एक रेकॉर्डच आहे. स्पेनने या सामन्यात आपले 100 गोल पूर्ण केले. स्पेनने वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी