Big Bash League: Glenn Maxwellने पकडला असा जबरदस्त कॅच, स्वत:ही झाला हैराण

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 17, 2022 | 15:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

Glenn Maxwell: मॅक्सवेलने ब्रिस्बेन हीटचा फलंदाज सॅम हेजलेटचा जबरदस्त कॅच घेत त्याला पॅव्हेलियनमध्ये धाडले. या जबरदस्त कॅचशिवाय त्याने १९ धावा देत २ विकेट घेतल्या.

glenn maxwell
Glenn Maxwellने पकडला असा जबरदस्त कॅच, स्वत:ही झाला हैराण 
थोडं पण कामाचं
  • ग्लेन मॅक्सवेलचा जबरदस्त कॅच
  • मेलबर्न स्टार्स विरुद्ध ब्रिस्बेन हीटविरुद्धच्या सामन्यात घेतला कॅच
  • मेलबर्न स्टार्सच्या विजयाचा हिरो ग्लेन मॅक्सवेल

मुंबई: बिग बॅश लीग(Big Bash League) मध्ये रविवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात मेलबर्न स्टार्सने(Melbourne Stars)  ब्रिस्बेन हीटला (Brisbane Heat) ८ विकेटनी हरवले. मेलबर्न स्टार्सच्या विजयाचा हिरो ठरला कर्णधार ग्लेन मॅक्सवेल(Glenn Maxwell). त्याने ऑलराऊंडर कामगिरी केली. मॅक्सवेलने ब्रिस्बेन हीटचा फलंदाज सॅम हेजलेटचा जबरदस्त कॅच पकडत त्याला तंबूत धाडले. या जबरदस्त कॅचशिवाय त्याने १९ धावा देत २ विकेटही मिळवल्या. Glenn maxwell awesome catch during big bash league

मॅक्सवेलने आपल्या फलंदाजीतही दम दाखवला. त्याने ३० चेंडूत ३७ धावा करत आपल्या संघाचा विजय सुनिश्चित केला. या विजयासह मेलबर्न स्टार्सचे अंक २२ झाले आहेत. ते गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहेत. तसेच फायनलच्या शर्यतीत आहेत. 

मॅक्सवेलने पकडला कमालीचा कॅच

ब्रिस्बेन  हीटच्या डावाच्या १६व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर सॅम हेजलेटने नाथन कुल्टर नाईटलच्या बॉलवर मिड ऑनवरून शॉट खेळला. ग्लेन मॅक्सवेलने मिड ऑनवरून धावताना एका हाताने जबरदस्त कॅच पकडला. कॅच पकडल्यानंतर त्यालाही विश्वास बसत नव्हता. तो आश्चर्यचकित होऊन येथे तेथे पाहू लागला. हेजलेटने ८ चेंडूत ९ धावा केल्या.

ब्रिस्बेन हीटकडून बेन डकेटने सर्वाधिक ५१ धावा केल्या. त्याने ४२ चेंडूंचा सामना केला. याशिवाय कर्णधार क्रिस लिननेही २८ धावांची खेळी केली. ब्रिस्बेन हीटने पहिल्यंदा फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये ६ विकेट गमावत १४९ धावा केल्या. मेलबर्नने १५० धावांचे लक्ष्य १३.५ ओव्हरमध्ये २ विकेट गमावत पूर्ण केले. सलामीवीर जो क्लार्कने सर्वाधिक ६२ धावा केल्या.  

बिग बॅश लीगमध्ये भारतीय वंशाच्या खेळाडूचा जलवा

ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये भारतीय वंशाचा खेळाडू गुरिंदर सिंह संधूचा जलवा पाहायला मिळत आहे. सिडनी थंडर्सच्या गुरिंदर सिंह संधूने पर्थ स्कोचर्सविरुद्धच्या सामन्यात हॅटट्रिक घेत इतिहास रचला. गुरिंदरची ऑस्ट्रेलियामध्ये ही तिसरी हॅटट्रिक आहे. तसेच बीबीएलमध्ये ही पहिली. त्याने याआधी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये दोन हॅटट्रिक घेतल्या आहेत असे करणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी