मुंबई: ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने(australian cricketer glenn maxwell) बिग बॅश लीगमध्ये(big bash league) वादळ आणले. मॅक्सवेलने बुधवारी बीबीएलमधील सामन्यात रेकॉर्डचा पाऊस पाडला. मेलबर्न स्टार्सचा कर्णधार मॅक्सवेलने होबार्ट हरिकेन्सविरुद्ध ६४ चेंडूत २२ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद १५४ धावांची खेळी केली. बिग बॅश लीगच्या इतिहासातील हा सर्वोच्च स्कोर आहे glenn maxwell scores not out 154 in big bash league
याआधी हा रेकॉर्ड मार्कस स्टोयनिसच्या नावावर होता. मेलबर्न स्टार्सचा फलंदाज स्टॉयनिसने जानेवारी २०२०मध्ये सिडनी सिक्सर्सविरुद्ध ७९ चेंडूत नाबाद १४७ धावा ठोकल्या होत्या.
यादरम्यान मॅक्सवेलने आपले शतक केवळ ४१ बॉलमध्ये पूर्ण केले. हे बीबीएलच्या इतिहासातील दुसरे वेगवान शतक आहे. या स्पर्धेत सर्वात वेगवान शतक बनवण्याचा रेकॉर्ड क्रेग सिमन्सच्या नावावर आहे. सिमन्सने बीबीएलच्या तिसऱ्या हंगामात पर्थ स्कॉचर्सकडून खेळताना अॅडलेड स्ट्रायकर्सविरुद्ध ३९ धावांत शतक ठोकले होते. मॅक्सवेलच्या या शानदार खेळीच्या जोरावर मेलबर्न स्टार्सने २० ओव्हरमध्ये २७३ धावा केल्या. बिग बॅश लीगच्या इतिहासातील हा सर्वात मोठा स्कोर आहे. याआधी गेल्या हंगामात सिडनी थंडरने सिडनी सिक्सर्सविरुद्ध खेळताना ५ बाद २३२ धावा केल्या होत्या.
मॅक्सवेलचे फॉर्ममध्ये येणे ही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी चांगली बाब आहे. मॅक्सवेलला आरसीबीने आयपीएल २०२२च्या लिलावात आधीच आपल्या संघात रिटेन केले होते. मॅक्सवेल आयपीएल २०२१मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. मॅक्सवेलने १५ सामन्यांमध्ये ४२.७५च्या सरासरीने ५१३ धावा केल्या. यात ६ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने आरसीबीसाठी गेल्या हंगामात २१ सिक्स ठोकले होते.