VIDEO:जर हा कॅच यशस्वी झाला असता कर जग कधीच विसरले नसते...

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Mar 31, 2021 | 18:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

Glenn Phillips catch Attempt: न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ग्लेन फिलिप्सने एक कॅच पकडण्याचा जबरदस्त प्रयत्न केला होता

Glenn Phillips
VIDEO:जर हा कॅच यशस्वी झाला असता कर जग कधीच विसरले नसते... 

थोडं पण कामाचं

  • ग्लेन फिलिप्सने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात कॅच पकडण्याचा प्रयत्न केला
  • ग्लेन फिलिप्स हा कॅच पकडू शकला नाही मात्र त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 
  • न्यूझीलंडने दुसऱ्या टी-२० इंटरनॅशनल सामन्यात बांगलादेशवर मात केली होती. 

नेपियर: न्यूझीलंडच्या(new zealand) ग्लेन फिलिप्सचा(glenn philips) एक व्हिडिओ(video) सोशल मीडियावर(social media) चांगलाच व्हायरल होत आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० इंटरनॅशनल सामन्यात ग्लेन फिलिप्सने एक शानदार कॅच पकडण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र हा कॅच तो पकडू शकला नाही. यानंतरही फिलिप्सने केलेल्या प्रयत्नांचे जोरदार कौतुक केले जात आहे. त्याचा कॅच पकडण्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

न्यूझीलंडने दुसऱ्या टी-२० इंटरनॅसनल सामन्यात डकवर्थ लुईस नियमाच्या आधारावर बांगलादेशविरुद्ध २८ धावांनी विजय मिळवला. या मालिकेत त्यांनी २-० अशी आघाडी मिळवली आहे. न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना १७.५ षटकात ५ बाद १७३ धावा केल्या. यानंतर बांगलादेशला १६ षटकांत १४८ धावांचे आव्हान मिळाले. 

पावसामुळे काही काळ खेळ थांबवण्यात आला होता. जेव्हा पुन्हा सुरूवात झाली तेव्हा बांगलादेशला १६ षटकांत १७० धावांचे लक्ष्य मिळाले. त्यानंतर यात सुधारणा करून १७१ करण्यात आले. बांगलादेशला या आव्हानाचा पाठलाग करता आला नाही त्यांनी १६ षटकांत सात बाद १४२ धावा केल्या आणि त्यांना २८ धावांनी पराभव सहन करावा लागला. 

तर तो कॅच विलक्षण ठरला असता

बांगलादेशच्या समोर मोठे आव्हान होते अशातच ते आक्रमक शैलीत फलंदाजी करत होते. न्यूझीलंडचा लेग स्पिनर ईशसोढीच्या चेंडूवर मोहम्मद नईमने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. त्याने डीप मिडविकेटवरून हा शॉट खेळला. तेव्हा फिलिप्स हा कॅच घेण्यासाठी धावला. तो बराच वेगाने धावला. बॉल पकडण्यासाठी त्याने हवेत स्वत:ला झोकून दिले. 

दरम्यान, इतके कठीण प्रयत्न करूनही फिलिप्स यात यशस्वी होताना दिसत होता . फिलिप्सचे दोन्ही हात बॉलपर्यंत पोहोचले मात्र त्यानंतरही तो बॉल पकडू शकला नाही. हा कॅच ड्रॉप जरूर झाला मात्र त्याने जे काही प्रयत्न केले त्यासाठी त्याचे जोरदार कौतुक केले जात आहे. इतर खेळाडू याप्रकारचे प्रयत्न करून कदाचित तिथपर्यंतही पोहोचू शकले नसते. फिलिप्सची ही क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी