गोल्ड मेडल जिंकणाऱ्या जेरेमीला आवडते ही डिश

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 01, 2022 | 12:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

वयाच्या अवघ्या १९ वर्षात बर्मिंगहॅममध्ये ६७ किलो वजनी गटात गोल्ड मेडल जिंकणाऱ्या जेरेमी लेलरिनूंगाचे यश हे खरंच वाखाणण्याजोगे आहे. 

jeremy
गोल्ड मेडल जिंकणाऱ्या जेरेमीला आवडते ही डिश 
थोडं पण कामाचं
  • इंटरनॅशनल युथ ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकल्यानंतर लगेचच जेरेमीने आपला वजन गट बदलला होता.
  • जेरेमीने कॉमनवेल्थ खेळांमध्ये गोल्ड मेडल तर जिंकले आहे मात्र अजूनही त्याचे मुख्य लक्ष्य दूर आहे.
  • टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळवण्यात आलेल्या क्वालिफाईंग राऊंडमध्ये गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो भाग घेऊ शकला नव्हता.

मुंबई: गेल्या चार वर्षात वेटलिफ्टिंगच्या दुनियेत तो एक चॅम्पियन म्हणून उभा राहिला आहे. साधारण चार वर्षांपूर्वी वेटलिफ्टिंगच्या दुनियेत पहिल्यांदा या चॅम्पियनचे नाव ऐकले होते. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनस आयर्समध्ये खेळवण्यात आलेल्या युथ ऑलिम्पिक गेम्समध्ये ८ ऑक्टोबर २०१८ला ६२ किलो वर्गात त्याने गोल्ड मेडल जिंकले होते. युथ ऑलिम्पिक गेम्समध्ये एखाद्या भआरतीयाचे हे पहिले गोल्ड मेडल होते. 

अधिक वाचा - पोलीस कर्मचाऱ्याच्या गाण्यानं बाबा बनले 'यमला पगला दीवाना'

त्याच्या यशाचा परिणाम भारतीय दलावर असा झाला की मानू भाकर आणि सौरव चौधरीने पुढील दोन दिवसांत दोन गोल्ड मेडल जिंकत भारताला जबरदस्त विजय मिळवून दिला होता. अर्जेंटिनापासून हजारो किमी दूर जेरेमीचे आई-वडील आणि त्यांचे चार भाऊ तेव्हा इंटरनेटच्या गडबडीत आणि यूट्यूब स्ट्रीमिंगमध्ये अडचणी आल्यामुळे त्याला इतिहास बनताना पाहता आले नाही. 

जेरेमीचा इतिहास

मात्र रविवारी संपूर्ण कुटुंबाने आयजोल स्थित आपल्या घरात बसून बर्मिंगहॅममध्ये जेरेमीला इतिहास रचताना पाहिले. जेरेमीने क्लीन अँड जर्कमध्ये १६० किग्रॅ आणि स्नॅचमध्ये १४० किलो म्हणजेच एकूण ३०० किग्रॅ उचलत गोल्ड मेडल मिळवले. हा कॉमनवेल्थ खेळांमध्ये तयार झालेला नवा रेकॉर्ड आहे. दरम्यान शेवटच्या राऊंडमध्ये १६५ किग्रॅचे वजन उचलताना त्याला वाटत होते की तो सहज नव्हता आणि त्याला दुखापत झाली की काय असे वाटत होते. 

इंटरनॅशनल युथ ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकल्यानंतर लगेचच जेरेमीने आपला वजन गट बदलला होता. मात्र त्याचा परिणाम त्याच्या खेळावर झाला. २०१९च्या वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये तो २१व्या स्थानावर राहिला. मात्र यानंतर त्याने जोरदार पुनरागमनन केले. दोन वर्षानंतर ताश्कंदमध्ये खेळवण्यात आलेल्या कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये जेरेमीने भारतासाठी ६७ किलो वजनी गटात गोल्ड मेडल मिळवले. 

जेरेमीने कॉमनवेल्थ खेळांमध्ये गोल्ड मेडल तर जिंकले आहे मात्र अजूनही त्याचे मुख्य लक्ष्य दूर आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळवण्यात आलेल्या क्वालिफाईंग राऊंडमध्ये गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो भाग घेऊ शकला नव्हता. जर त्याने भाग घेतला असता तर टोकियो ऑलिम्पिकमध्ये तो पदकाचा दावेदार असता. जेरेमीच्या वडिलांचे म्हणणे आहे की जेरेमीचे लक्ष्य हे कोणत्याही परिस्थितीत २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवणे आहे. 

अधिक वाचा - सोन्याच्या भावातील तेजीला लगाम, चांदीही घसरली

जेरेमीच्या आईच्या मते त्याच्या चॅम्पियन मुलाला इतर मुलांप्रमाणेच फिरण्याची आवडत आहे मात्र आईच्या हाताचे बनवलेले चिकन हे त्याचे फेव्हरिट खाणे आहे. चिकनशिवाय बटाट्याची भाजी आणि डाळ जेरेमीला खूप पसंत आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी