Meerabai Chanu : सुवर्णपदक विजेती मीराबाईला व्हायच्या प्रचंड वेदना, तरीही सुरूच ठेवली प्रॅक्टिस, ट्रेनिंगचे किस्से वाचून उडेल थरकाप

वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक मिळवलेल्या मीराबाईनं प्रचंड वेदना सहन करत प्रॅक्टिस केली. तिच्या या संघर्षाची ही कहाणी

Meerabai Chanu
सुवर्णपदक विजेती मीराबाईला व्हायच्या प्रचंड वेदना  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • गोल्ड मेडल जिंकलेल्या मीराबाईची कहाणी
  • वेदना असतानाही सुरु होती प्रॅक्टिस
  • कोचने बदलून टाकला मीराबाईचा खेळ

Meerabai Chanu : कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) मध्ये मीराबाई चानूनं (Meerabai Chanu) वेटलिफ्टिंगमध्ये (Weightlifting) भारताला पहिलं सुवर्णपदक (First gold medal) जिंकून दिलं. 49 किलो वजनीगटात मीराबाईनं 201 किलो वजन उचललं. यापैकी स्नॅच प्रकारात तिने 88 किलो वजन उचललं तर क्लीन अँड जर्क प्रकारात 113 किलो वजन उचललं. वेललिफ्टिंग स्पर्धेत स्नॅच आणि क्लीन अँड जर्क असे दोन प्रकार असतात. या दोन्ही प्रकारांनी वजन उचलणं हे मोठं आव्हानात्मक काम असतं. वजन उचलताना थोडी जरी तांत्रिक चूक झाली तरी गंभीर शारीरिक दुखापत होण्याची शक्यता असते. जेव्हा मीराबाई चानूनं वेटलिफ्टिंगच्या प्रॅक्टिसला सुरुवात केली, तेव्हा तिला प्रचंड वेदना (Pains) होत होत्या. मात्र माघार न घेता तिने कसून सराव सुरूच ठेवला होता. 

वेदना असूनही सराव

मीराबाई चानूच्या छोट्याशा खेड्यात वेटलिफ्टिंगच्या प्रॅक्टिसची सोय नव्हती. त्यामुळे  तिला रोज 50-60 किलोमीटरचा प्रवास करून शहरात यावं लागायचं. वयाच्या अकराव्या वर्षी अंडर-15 स्पर्धेत मीराबाईनं चँपियनशिप जिंकली. त्यानंतर रियो ऑलिम्पिक 2016 मध्ये पदक जिंकू न शकल्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती. खेळ सोडून देण्याचा विचार तिने केला होता. मात्र तिने या नकारात्मक विचारावर लवकरच मात केली आणि पुन्हा इतिहास रचला. प्रॅक्टिस करताना एकही दिवस असा नव्हता, जेव्हा मला वेदना होत नव्हत्या, अशी प्रतिक्रिया 2021 साली एका मुलाखतीदरम्यान मीराबाई चानूनं दिली होती. आदल्या दिवशी जर स्नॅचमध्ये 75-80 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 100 किलो वजन उचलल्यावर दुसऱ्या दिवशी मला विश्रांती घ्यावी लागत असे. कारण माझी पाठ भरून यायची आणि दुसरं काहीच करता यायचं नाही. 

अधिक वाचा - Commonwealth Games 2022: भारताला दुसरं गोल्ड मेडल, Jeremy Lalrinnunga ने Weightlifting मध्ये पटकावलं Gold

हे होतं कारण

मीराबाई चानूच्या कोचनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार तिचा डावा खांदा उजव्या खांद्याच्या तुलनेत कमजोर होता. त्यामुळे उजव्या खांद्याकडून अधिक जोर लावला जायचा. त्यामुळे तोच खांदा जास्त दुखायचा. तिच्या बसण्याच्या आणि उठण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे कंबरेवरही परिणाम होऊन कंबरदुखी सुरू झाली होती. कोच विजय शर्मा यांनी हे तांत्रिक दोष सुधारण्याची सूचना केली आणि त्यानंतर मीराबाईला होणाऱ्या वेदना कमी झाल्या. 

अधिक वाचा - Commonwealth Games 2022: वेटलिफ्टिंगमध्ये बिंदयाराणी देवीने पटकावलं रौप्य पदक; weight lifting मध्ये भारताकडे दोन Silver Medal

सर्किट आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग

मीराबाईने आपल्या ट्रेनिंगचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यातून ती किती हार्ड ट्रेनिंग करते, हे दिसून येतं. तिच्या प्रॅक्टिसमध्ये सर्किट ट्रेनिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग, बॅलन्सिंग एक्सरसाईज, हेवी स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कोअर एक्सरसाईझ या क्रमाने प्रॅक्टिस करण्यात येते. 4 फूट 11 इंच उंची असणाऱ्या मीराबाईने नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत 201 किलो वजन उचलत विक्रम रचला आणि सुवर्णपदक मिळवलं. मीराबाईचं हे स्ट्रगल आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी