Neeraj Chopra Javelin throw: नीरज चोप्राची आणखी एक शानदार कामगिरी, चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी क्वालिफाय

Olympic Gold Medalist Neeraj Chopra News: नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) पुन्हा एकदा शानदार कामगिरी केली आहे.

 Neeraj Chopra
नीरज चोप्रा 
थोडं पण कामाचं
  • नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) पुन्हा एकदा शानदार कामगिरी केली आहे.
  • नीरजनं जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2022 मध्ये पात्रता फेरीत चमकदार कामगिरी केली आहे.
  • या चॅम्पियनशिपमध्ये 24 वर्षीय नीरज चोप्रासोबत जगभरातील 34 भालाफेकपटूंचाही सहभाग होता.

नवी दिल्ली: Neeraj Chopra News: ऑलिम्पिक सुवर्णपदक (Olympic gold medalist) विजेता नीरज चोप्रानं (Neeraj Chopra)  पुन्हा एकदा शानदार कामगिरी केली आहे. ऑलिम्पिक गोल्डन बॉय नीरज चोप्रानं या चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत तो पहिल्यांदा क्वॉलिफाय झाला आहे. यूजीन, यूएसए येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (World Athletics Championships) त्यानं स्वतःच्या कामगिरीनं पुन्हा एकदा सर्वांना थक्क केलं. नीरज चोप्रानं पहिल्याच प्रयत्नात 88.39 मीटर फेक करून पुरुषांच्या भालाफेकची (Men's Javelin Final) अंतिम फेरी गाठली. (Javelin throw)

टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा आता जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्येही सुवर्ण यशाच्या जवळ आहे. नीरजनं जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2022 मध्ये पात्रता फेरीत चमकदार कामगिरी केली आहे. भारताचा स्टार जेवलिन थ्रोअर नीरजने पहिल्याच प्रयत्नात 88.39 मीटर भालाफेक करून पुरुषांच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं. या चॅम्पियनशिपमध्ये 24 वर्षीय नीरज चोप्रासोबत जगभरातील 34 भालाफेकपटूंचाही सहभाग होता.

अधिक वाचा-  भिवंडीत लगेचच बदलली निष्ठा, आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेला शिवसैनिकांची मोठी गर्दी, पण पाठ फिरताच...

नीरजकडून कारकिर्दीतील तिसरा सर्वोत्तम थ्रो

या सर्वांमध्ये अंतिम फेरीसाठी लढत झाली. सर्वांना दोन गटात ठेवण्यात आले होते, त्यापैकी अ गटात असलेल्या नीरजने कारकिर्दीतील तिसरा सर्वोत्तम थ्रो मारून अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. नीरजशिवाय भारतीय अॅथलीट रोहित यादवही ब गटात खेळताना दिसणार आहे.

अमेरिकेत सुरू आहे स्पर्धा 

अमेरिकेतील ओरेगॉन येथे झालेल्या या स्पर्धेत नीरज चोप्राच्या इव्हेंटमध्ये एकूण 34 स्पर्धकांनी सहभाग घेतला. नीरज चोप्रा पात्रता फेरीच्या अ गटात होता आणि तो फेकणारा पहिला खेळाडू होता. नीरजनं आपले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ घेतला नाही. अंतिम सामना रविवारी पहाटे होणार आहे.

पुरुषांच्या या स्पर्धेतील 34 भालाफेकपटूंपैकी नीरज चोप्रासह टॉप-12 स्टार खेळाडू पात्र ठरले आहेत. नीरजसोबतच झेक प्रजासत्ताकचा जेकब वडलेजही पहिल्याच प्रयत्नात 85.23 मीटर अंतरावर भालाफेक करून अंतिम फेरीसाठी पात्र ठरला.
 
नीरजची सातत्यानं शानदार कामगिरी सुरूच

नीरज चोप्रानं या सीजनमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे, जी आतापर्यंत सुरू आहे. स्टार खेळाडूने दोनदा वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्याने 14 जून रोजी फिनलंडमधील पावो नुर्मी गेम्समध्ये 89.30 मीटर आणि 30 जून रोजी प्रतिष्ठित स्टॉकहोम डायमंड लीग स्पर्धेत 89.94 मीटर फेकले, 90 मीटर अंतर केवळ सहा सेंटीमीटरने गमावले.  नीरज चोप्रानं अलीकडेच डायमंड लीगमध्ये ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सच्या जागतिक विजेतेपदानंतर दुसरे स्थान पटकावले. पीटर्सने 90.31 मीटरच्या प्रयत्नाने सुवर्णपदक जिंकले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी