Golden Boy Neeraj Chopra : उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी दिलेलं वचन पूर्ण केलं, नीरज चोप्राला मिळालं गिफ्ट

Golden Boy Neeraj Chopra :  नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राला उद्योगपती महिंद्रा यांनी एक वचन दिलं होतं. ते त्यांनी पाळले असून नीरजला त्यांनी खास गिफ्ट दिले आहे.

 golden boy neeraj chopra: Special gift from industrialist Anand Mahindra, thank you Neeraj
golden boy neeraj chopra : उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी दिलेलं वचन पूर्ण केलं, नीरज चोप्राने मिळालं गिफ्ट।  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ऑलिम्पिकनंतर नीरज चोप्राला उद्योगपती महिंद्रा यांनी एक वचन दिलं
  • आनंद महिंद्राकडून गोल्डन बॉय नीरज चोप्राला खास भेट
  • त्यानंतर नीरजने त्यांना आभार मानले.

Golden Boy Neeraj Chopra :  मुंबई :  टोकियो ऑलिम्पिकमध्ये  (Tokyo Olympics) भालाफेकमध्ये  (Javelin throw) नीरज चोप्राने (Neeraj Chopra) उत्कृष्ट कामगिरी करत इतिहास घडवला. नीरज चोप्रा यानं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यामुळे त्याच्यावर आजही देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यावेळी त्याला प्रसिध्द उद्योगपती आनंद महिंद्रा (Industrialist Anand Mahindra) यांनी एक वचन दिलं होतं. ते वचन आज यांनी पूर्ण केलं आणि त्याला एक खास भेट दिली. त्यानंतर नीरजने त्यांना आभार मानले. (golden boy neeraj chopra: Special gift from industrialist Anand Mahindra, thank you Neeraj)

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरीचे कौतुक करण्यासाठी आंदन महिंद्रा यांनी त्याचे सोशल मिडियावर अभिनंदन केले होते. तेव्हा एका युजरनं आनंद महिंद्रा यांना नीरजला Xuv700 गिफ्ट देण्याचा सल्ला दिला होता. त्यावर महिंद्रा यांनी तात्काळ रिप्लाय देत  त्यांच्या कंपनीतील दोन अधिकाऱ्यांना टॅग करून  नीरजसाठी Xuv700 गिफ्ट म्हणून तयार करण्यास सांगितली होती. आज अखेर आनंद महिंद्रा यांनी नीरजला दिलेलं वचन पूर्ण केलं आणि नीरजला नवी कोरी गाडी गिफ्ट म्हणून पाठवली. इतकेच नव्हे तर त्या गाडीवर 87.58 असं देखील लिहिलं हे. सोबत भाल्याची प्रतिकृतीही त्यावर लावलेली पाहायला मिळत आहे.  

नीरजनं 87.58 मीटर लांब भालाफेकून सुवर्ण जिंकले होते त्यामुळं त्याच्यासाठी ही खास गाडी तयार करण्यात आली आहे.  टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णफेक करत भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव झाला होता. नीरजनं इतिहास रचत चमकदार कामगिरी नीरजने 87.88 मीटर भाला फेकत सुवर्ण पदकाचा वेध घेतला.  भारताला तब्बल 13 वर्षानंतर  म्हणजे 2008 बीजिंग ऑलिम्पिकनंतरचं हे पहिलं सुवर्ण पदक आहे. आजही त्याच्यावर कौतुकांचा व बक्षीसांचा वर्षाव झाला. त्याच्या या त्याला अनेक जाहीराती देखील मिळू लागल्या आहेत. पण आनंद महिंद्रांनी  दिलेलं  गिफ्ट त्याच्यासाठी खास असल्याने निरजने सोशल मिडियावर पोस्ट टाकून त्यांचे आभार मानले.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरीचे कौतुक करण्यासाठी आंदन महिंद्रा यांनी त्याचे सोशल मिडियावर अभिनंदन केले होते. त्यांच्याकडे सर्वांचेच लक्ष होते. त्यावेळेस एका युजरनं आनंद महिंद्रा यांना नीरजला Xuv700 गिफ्ट देण्याचा सल्ला दिला होता. त्यावर महिंद्रा यांनी तात्काळ रिप्लाय देत  त्यांच्या कंपनीतील दोन अधिकाऱ्यांना टॅग करून  नीरजसाठी Xuv700 गिफ्ट म्हणून तयार करण्यास सांगितली होती. आनंद महिंद्रा सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह असतात.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी