भारतासाठी हिमा दास करणार ‘हे’ काम, पंतप्रधानांना ‘गोल्डन गर्ल’नं दिलं वचन

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 22, 2019 | 20:03 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Hima Das Responds to PM Tweet: हिमा दास या भारताच्या स्टार धावपटूनं शनिवारी भारतासाठी पाचवं सुवर्णपदक जिंकलं. तिनं ४०० मीटर रेसमध्ये दमदार कामगिरी करत हे यश मिळवलंय.

Hima Das
भारतासाठी हिमा दास करणार‘हे’ काम, ‘गोल्डन गर्ल'नं दिलं वचन 

थोडं पण कामाचं

  • गोल्डन गर्ल हिमा दासला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा
  • हिमा दासनं देशासाठी आणखी पदक जिंकण्याचं दिलं वचन
  • मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंही दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली: भारताची स्टार धावपटू हिमा दासला देशातील दिग्गजांकडून शुभेच्छा मिळताहेत. तरुण एथलिट असलेल्या हिमानं मागील २० दिवसांमध्ये युरोपात ५ वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पाच सुवर्णपदकं जिंकले आहेत. तिला आता ‘गोल्डन गर्ल’ नावानं ओळखलं जातंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिमा दासला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. हिमानं सुद्धा पंतप्रधानांना उत्तर दिलंय. भारताची स्टार एथलिट हिमानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या ट्वीटवर उत्तर देत म्हटलं, की ती सतत खूप मेहनत घेईल आणि देशासाठी आणखी पदकं जिंकेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिमा दासच्या विजयानंतर रविवारी हिमासाठी ट्वीट केलं होतं, ‘भारताला हिमा दासचा अभिमान आहे. मागील काही दिवसांमध्ये खूप कमालीचं यश मिळवलंय. प्रत्येकाला याचा आनंद होईल की, ती वेगवेगळ्या टूर्नामेंट्समधून पाच मेडल जिंकून घरी आणत आहे. खूप खूप अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा!’

यावर हिमानं उत्तर दिलंय, ‘इतक्या छान शब्दांसाठी धन्यवाद नरेंद्र मोदी सर. मी सलग खूप मेहनत करून देशासाठी अधिक पदकं जिंकेल.’

 

 

 

हिमा दासला देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह देशभरातील दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या आहेत. १९ वर्षीय एथलिटनं नुकतंच युरोपमध्ये आपलं पाचवं गोल्ड मेडल जिंकलं. ‘ढिंग एक्सप्रेस’नं खुलासा केलाय की, रविवारी संध्याकाळी क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकरनं फोन करून हिमाला शुभेच्छा दिल्या होत्या. हिमानं सांगितलं, ‘आज संध्याकाळी मला असं वाटलं की, माझं स्वप्न पूर्ण झालंय. मला माझ्यासाठी आदर्श असलेल्या आणि क्रिकेटच्या देवाचा सचिन तेंडुलकर यांचा फोन आला. आपण शुभेच्छा दिल्या आणि माझा उत्साह वाढवला त्यासाठी धन्यवाद. मी आपलं मिशन पूर्ण करण्यासाठी खूप परिश्रम घेईल.’

 

 

 

 

भारताच्या हिमा दासनं शनिवारी आणखी एक सुवर्ण पदक आपल्या नावावर केलंय. हिमानं झेक गणराज्यातील नोवे मेस्टो नाड मेटुजी ग्रां पीमध्ये महिलांसाठीच्या ४०० मीटर स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला. यापूर्वी तिनं २ जुलैला युरोपात, ७ जुलैला कुंटो एथलेटिक्स मीटमध्ये, १३ जुलैला चेक गणराज्यमध्ये आणि १७ जुलैला टाबोर ग्रां पी अशा विविध स्पर्धांमध्ये सुवर्ण पदकं जिंकली आहेत.

 

 

टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन रिषभ पंतनं सुद्धा हिमा दासला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानं ट्विट करत म्हटलं, ‘हिमा दास तुम्ही खरंच प्रेरणास्रोत आहेत. भारताची गोल्डन गर्ल. सलाम बॉस!’

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
भारतासाठी हिमा दास करणार ‘हे’ काम, पंतप्रधानांना ‘गोल्डन गर्ल’नं दिलं वचन Description: Hima Das Responds to PM Tweet: हिमा दास या भारताच्या स्टार धावपटूनं शनिवारी भारतासाठी पाचवं सुवर्णपदक जिंकलं. तिनं ४०० मीटर रेसमध्ये दमदार कामगिरी करत हे यश मिळवलंय.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...