IND vs SA: भारतासाठी खुशखबर तर द. आफ्रिकेसाठी वाईट बातमी

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 29, 2021 | 12:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

Good news for team india: भारताविरुद्धच्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या कसोटी सामन्याच्या आधी आफ्रिका संघासाठी वाईट बातमी समोर आली आहे. 

quinton de kock
IND vs SA: भारतासाठी खुशखबर तर द. आफ्रिकेसाठी वाईट बातमी 
थोडं पण कामाचं
  • द. आफ्रिका संघाला मोठा धक्का
  • डी कॉक भारताविरुद्धच्या पुढील दोन कसोटीत खेळणार नाही
  • विकेटकीपर खेळाडू लवकरच बनणार आहे बाब

केपटाऊन: भारत (India) आणि दक्षिण अफ्रीका क्रिकेट टीम (South Africa National Cricket Team) यांच्यात सुरू असलेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियन(Centurion) स्थित सुपरस्पोर्ट्स पार्क क्रिकेट स्टेडियमध्ये(SuperSport Park Cricket Stadium) खेळवला जात आहे. पहिला सामना संपल्यानंतर या मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे तीन ते सात जानेवारी जोहान्सबर्ग आणि ११ ते १५ जानेवारीदरम्यान केपटाऊन येथे खेळवला जाणार आहे. Good news for team india but sad news for team south africa

दुसरा आणि तिसरा कसोटी सामना सुरू होण्याआधी आफ्रिकेच्या संघासाठी वाईट बातमी समोर आली आहे. संघातील २९ वर्षीय अनुभवी विकेटकीपर खेळाडू क्विंटन डी कॉकची पत्नी लवकरच बाळाला जन्म देणार आहे. या दरम्यान क्विंटन डी कॉक आपल्या पहिल्या मुलाच्या जन्माच्या वेळेस तेथे उपस्थित राहू उच्छिततो. त्यामुळे या खेळाडूने दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान पॅटर्निटी लीव्ह घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी अशी शक्यता व्यक्त केली जात होती की तो केवळ तिसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध असणार आहे. मात्र बॉक्सिंग डेच्या तिसऱ्या दिवशी कमेंट्रीदरम्यान समजले की तो आगामी दोन कसोटींसाठी उपलब्ध असणार नाही. 

दरम्यान, ही बातमी समोर आल्यानंतर आफ्रिकेच्या संघाच्या समस्या वाढताना दिसत आहेत तर दुसरीकडे भारतासाठी ही गुडन्यूज आहे. कारण जेव्हा कॉकची बॅट तळपते तेव्हा एकटा सामन्याचे चित्र बदलतो. या आफ्रिकेन केळाडूने आपल्या संघासाठी आतापर्यंत ५३ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान ८९ डावांमध्ये त्याने ३९.१ च्या सरासरीने ३२४५ धावा केल्या आहेत. डी कॉकच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ६ शतके आणि २२ अर्धशतके आहेत. 

खास आहे २०० वा विकेट

द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या डावात ५ विकेट आपल्या नावे करणारा मोहम्मद शमीने २०० विकेटचा टप्पा गाठला. त्याच्यासाठी हे मोठे यश आहे.विशेष म्हणजे भारतासाठी  कसोटी सामन्यात कमी बॉल टाकून त्याने ही कामगिरी केली. २०० विकेट घेण्यसाठी शमीने ९८६९ बॉल खर्च केले.. या वर्षी मोहम्मद शमीला सोशल मीडियावर ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता. जेव्हा टी-२० वर्ल्डकपमध्ये मोहम्मद शमीची पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खराब कामगिरी झाली होती तेव्हा त्याला ट्रोल करण्यात आले होते. त्यावेळेस विराट कोहली स्वत: शमीच्या सपोर्टमध्ये आला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी