Team India: टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी मोठी खुशखबर, दुखापतीतून बरा होऊन परतला हा मॅच विनर

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 01, 2022 | 12:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

Team India Squad Announced: टीम इंडियाचा एक मोठा मॅच विनर खेळाडू दुखापतीतून बरा होऊन संघात परतला आहे. हा खेळाडू आशिया कप दरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. 

team india
good news for team india during T20 World Cup 2022 
थोडं पण कामाचं
  • 33 वर्षीय रवींद्र जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती.
  • आशिया कपमधील 2 सामने खेळल्यानंतर तो दुखापतीमुळे स्पर्धेत खेळू शकला नव्हता.
  • यानंतर त्याच्या या गुडघ्याची सर्जरीही झाली होती आणि तेव्हापासून तो नॅशनल अॅकॅडमीमध्ये होता.

मुंबई: टी20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup 2022)दरम्यान टीम इंडियासाठी(team india) मोठी खुशखबर समोर आली आहे. टीम इंडियाचा मोठा मॅचविनर दुखापतीतून बरा होत स्क्वॉडमध्ये परतला आहे. हा खेळाडू टी20 वर्ल्ड कप 2022(T20 World Cup 2022) बांगलादेश दौऱ्यावर(bangladesh tour) संघासोबत जोडला जाईल. दुखापतीमुळे हा खेळाडू  टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये भारतीय संघाचा भाग नव्हता.good news for team india during T20 World Cup 2022

अधिक वाचा - आजपासून मुंबईत चारचाकी वाहनांमध्ये सीटबेल्ट सक्ती

टीम इंडियामध्ये झाले पुनरागमन

आशिया कप 2022 (Asia Cup 2022)दरम्यान टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा जबरदस्त ऑलराऊंडर रवींद्र जडेजा दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर गेला होता. तो वर्ल्डकपमध्ये खेळत नाही आहे. मात्र बांगलादेश दौऱ्यावर तो पुन्हा एकदा संघात पुनरागमन करत आहे. बांगलादेशविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या वनडे आणि कसोटी मालिकेत रवींद्र जडेजाला सामील केले आहे. 

गुडघ्यावर झाली होती शस्त्रक्रिया

33 वर्षीय रवींद्र जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. आशिया कपमधील 2 सामने खेळल्यानंतर तो दुखापतीमुळे स्पर्धेत खेळू शकला नव्हता. यानंतर त्याच्या या गुडघ्याची सर्जरीही झाली होती आणि तेव्हापासून तो नॅशनल अॅकॅडमीमध्ये होता. रवींद्र जडेजासारखा मॅच विनर भारतीय संघात परतल्याने सर्व चाहत्यांसाठी ही मोठी खुशखबर आहे. 

संघासाठी ठरला मोठा मॅचविनर

जडेजाने आशिया कप 2022मध्ये पाकिस्तानविरुद्ध 29 बॉलमध्ये 35 धावांची खेळी केली होती. या सामन्यात रवींद्र जडेजाने टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले होते. तर हाँगकाँविरुद्ध रवींद्र जडेजाने 4 ओव्हरमध्ये 3.75 इकॉनॉमीने केवळ 15 धावा दिल्या आणि 1 विकेट मिळवला होता. 

बांगलादेश कसोटीसाठी टीम इंडिया 

रोहित शर्मा(कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

अधिक वाचा - कडूंच्या मेळाव्याच्या ठिकाणी झळकले 'मै झुकेगा नही' चे पोस्टर

बांग्लादेश वनडे के लिए टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप कर्णधार ), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, सुंदर, शार्दुल ठाकुर , मो. शमी, मो. सिराज, दीपक चाहर, यश दयाल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी