केपटाऊन: भारत (Team India) आणि दक्षिण अफ्रीका (South Africa) यांच्यातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील(one day series) पहिला सामना आज १९ जानेवारीला पार्ल येथे खेळवला जात आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता सुरू होणार आहे. वनडे मालिकेआधी टीम इंडियासाठी(team india) मोठी खुशखबर समोर आली आहे. असे वाटतं आहे की मालिका सुरू होण्यापूर्वीच टीम इंडिया ही मालिका जिंकेल. असे यासाठी कारण टीम इंडियाचा सगळ्यात मोठा शत्रू या वनडे मालिकेत खेळत नाही आहे.
खरंच, द. आफ्रिकेचा धोकादायक वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा भारताविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळणार नाही. कॅगिसो रबाडावरील कामाचे ओझे पाहता त्याला या मालिकेसाठी आराम देण्यात आला आहे. रबाडा या मालिकेत न खेळणे भारतासाठी एखाद्या बोनसपेक्षा कमी नाही.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले, वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाला भारताविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी आराम देण्यात आला आहे कारण गेल्या काही काळापासून त्याच्यावर कामाचे प्रचंड ओझे आहे आणि पुढील महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध्या कसोटी मालिकेआधी तो पुन्हा ताजातवाना झाला पाहिजे.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने म्हटले की कॅगिसो रबाडाच्या जागी कोणालाही निवडण्यात आलेले नाही. मात्र जार्ज लिंडेला अतिरिक्त स्पिन गोलंदाजीचा पर्याय म्हणून संघात ठेवण्यात आले आहे.
टेम्बा बावुोमा (कर्णधार) केशव महाराज (उपकर्णधार) क्विंटन डि कॉक (विकेटकीपर), जुबैर हमजा, मार्को जेनसेन, जानेमन मलान, सिसांडा मगला, एडेन मार्कराम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, वायने पर्नेल, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, जॉर्ज लिंडे, तबरेज शम्सी, रासी वान डर डुसेन, काइल वेरेन.