cricket stories : GPCC चा शानदार विजय, ३१ धावांनी केला DCAचा पराभव 

cricket u-16 premier league । मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या दिवंगत राम बरन मेमोरियल अंडर १२ प्रिमिअर लीग २०२२ स्पर्धेची दिमागदार सुरूवात झाली आहे. 

GPCC won brilliantly, defeated DCA by 31 runs
GPCC चा शानदार विजय, ३१ धावांनी केला DCAचा पराभव  
थोडं पण कामाचं
  • मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या दिवंगत राम बरन मेमोरियल प्रिमिअर लीग २०२२ स्पर्धेतील साखळी सामन्यात GPCCने  DCAचा ३१ धावांनी विजय मिळविला आहे. 
  • अनिल जैसवाल यांनी आपल्या आजोबांच्या स्मृती प्रित्यर्थ आझाद मैदानावर अंडर १२ स्पर्धेचे आयोजन करतात.
  • GPCCने वेदांग मिश्रा याने सर्वाधिक ३० धावा केल्या.

cricket stories  । मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या दिवंगत राम बरन मेमोरियल प्रिमिअर लीग २०२२ स्पर्धेतील साखळी सामन्यात GPCCने  DCAचा ३१ धावांनी विजय मिळविला आहे. 

अनिल जैसवाल यांनी आपल्या आजोबांच्या स्मृती प्रित्यर्थ आझाद मैदानावर अंडर १२ स्पर्धेचे आयोजन करतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे या स्पर्धा झाल्या नाही. यावर्षी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने छोट्या स्पर्धा  सर्व मार्गदर्शक नियम पाळून घेण्याची परवानगी मिळाली.  

GPCCने पहिल्यांदा फलंदाजी करताना २२ षटकात ५ बाद १२५ धावा केल्या.  GPCCने वेदांग मिश्रा याने सर्वाधिक ३० धावा केल्या. यात त्याने २ चौकार लगावले. श्रीयश चव्हाण  याने २२ आणि DCAकडून सर्वाधिक ३८ धावा विवेक याने केल्या.  

GPCCच्या १२५ धावांचा पाठलाग करताना DCA संघ ९४ धावांवर गारद झाला. GPCCकडून  रिधीत तेवर याने १९ धावा देत ५ विकेट घेतल्या. 

दुसरा सामना लो स्कोरिंग होता. अॅडव्हान्स एसएचा आरएन क्रिकेट संघाने दहा गडी राखून पराभव केला.  अॅडव्हान्स एसएने  २२ षटकात ९ बाद ४७ धावा केल्या.  या छोट्या धावांचा पाठलाग करताना आरएन क्रिकेट संघाने ६ षटकांत  ४८ धावा करून विजयश्री खेचून आणला. आरएन क्रिकेट संघाकडून कडून सर्वाधिक ३५ धावा इंद्रनील निकम याने केल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी