10 Cricket World Records: नवी दिल्ली : महिला कोणत्याच क्षेत्रात कमी नाहीत आणि नव्हत्या हे अलिकडे सिद्ध होत आहे. देश-विदेशात वेगवेगळ्या क्षेत्रात महिला (women) आपला डंका वाजवत आहेत. पुरुषाची मक्तेदारी असलेल्या क्रिकेटमध्येही (Cricket) महिला कमी नाहीत. इतकेच नाहीतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (international cricket) जे विक्रम पुरुषांना करता आले नाहीत ते उच्च विक्रम महिला खेळाडूंच्या नावावर आहेत. चला तर जाणून घेऊयात या विक्रमांविषयी
टी-20 इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंबद्दल बोलायचे झाल्यास, न्यूझीलंडची महिला फलंदाज सुझी बेट्स महिला किंवा पुरुष दोन्हींमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तिने राष्ट्रकुल स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 91 धावांची खेळी करून हा विक्रम केला. तिने आतापर्यंत 127 सामन्यात 3471 धावा केल्या आहेत. तिनं एक शतक आणि 22 अर्धशतके झळकावली आहेत. (सुझी बेट्स इन्स्टाग्राम)
Read Also : IND vs WI: जे कोणालाच जमले नाही ते हार्दिकने करून दाखवले
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा एकूण महिला आणि पुरुषांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 129 टी-20 सामन्यांमध्ये 32 च्या सरासरीने 3443 धावा केल्या आहेत. त्याने 4 शतके आणि 27 अर्धशतके झळकावली आहेत. 118 धावांची त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
आंतरराष्ट्रीय टी-20 च्या एका डावात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रमही महिलांच्या नावावर आहे. नेदरलँड्सच्या फ्रेडरिक ओव्हरडिकने फ्रान्सविरुद्ध 3 धावांत 7 बळी घेतले. पुरुष गटात नायजेरियाच्या पीटर अहोने 5 धावांत 6 बळी घेतले आहेत. पुरुष गटातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
युगांडाची ऑफस्पिनर अविको नुमुंगु हिच्या नावावर महिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक निर्धाव षटके टाकण्याचा विक्रम आहे. तिने आतापर्यंत 18 निर्धाव षटके टाकली आहेत. पुरुष गटात हा विक्रम भारताच्या जसप्रीत बुमराहच्या नावावर आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 9 निर्धाव षटके (मेडन ओव्हर) टाकल्या आहेत.
Read Also : CWG 2022: दिवस ६वा- भारताचे आज कोणते सामने, पाहा संपूर्ण याद
आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रमही महिलांच्या नावावर आहे. न्यूझीलंडच्या सुझी बेट्सने आतापर्यंत 378 चौकार मारले आहेत. दुसरीकडे, पुरुष क्रिकेटचा विचार केला तर हा विक्रम आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगच्या नावावर आहे. त्याने 332 चौकार मारले आहेत.
महिला टी-20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सलग 17 सामने जिंकण्याचा विक्रम थायलंडच्या नावावर आहे. हा विक्रम पुरुष संघाच्या बाबतीत 12 सामन्यांचा आहे. अफगाणिस्तान, रोमानिया आणि टीम इंडियाने अशी कामगिरी केली आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये इकॉनॉमी रेटमध्येही महिला सर्वोत्तम आहेत. 5 षटकांबद्दल बोलायचे झाले तर न्यूझीलंडची वेगवान गोलंदाज अॅना हॉकलीने 6 षटकात एकही धाव न देता विकेट घेतली आहे. पुरुषांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज फिल सिमन्सने 0.30 च्या इकॉनॉमीमध्ये 10 षटकांत 3 धावा दिल्या.
Read Also : कोरोना लसीकरण मोहीम संपताच देशात लागू होणार 'CAA '- अमित शहा
7) एकदिवसीय सामन्यातील विजय
सलग सर्वाधिक एकदिवसीय सामने जिंकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाच्या नावावर आहे. त्यांनी 2018 ते 2021 दरम्यान सलग 26 सामने जिंकले. पुरुष गटातील हा विक्रम 21 असा आहे. ऑस्ट्रेलियाच्या पुरुष संघाने 2003 मध्ये ही कामगिरी केली होती.
8) कमी गोलंदाजांनी उडवला विरोधकांचा धुव्वा
निच्चांकी धावसंख्येच्या बाबतीत पुरुष संघाने एका डावात फक्त 3 गोलंदाज वापरून विरूद्ध संघाचा डाव समाप्त केला होता. मात्र, महिलांनी फक्त 2 गोलंदाजांच्या जोरावर विरोधी संघाचा धुव्वा उडवला. 2011 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने नेदरलँड्सला 16.3 षटकात 36 धावांत गुंडाळले होते.
कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर येथे सर्वाधिक सामने पराभूत न होण्याचा विक्रमही महिलांच्या नावावर आहे. 1951 ते 1985 या काळात इंग्लंडच्या महिला संघाला 35 सामन्यांमध्ये कोणताही संघ पराभूत करू शकला नाही. पुरुष गटात हा विक्रम वेस्ट इंडिजच्या नावावर आहे. 1982 ते 1984 या काळात 27 सामन्यांत त्यांना कोणीही हरवू शकले नाही.