Australiaमध्ये धमाल करतोय भारतीय वंशाचा हा खेळाडू, घेतली तिसरी हॅटट्रिक

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 07, 2022 | 13:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

BBL:बिग बॅश लीगमध्ये भारतीय वंशाचा खेळाडू गुरिंदर सिंह संधूचा जलवा पाहायला मिळत आहे. सिडनी थंडर्सच्या गुरिंदर सिंह संधूने पर्थ स्कोचर्सविरुद्ध मॅच हॅटट्रिक घेत इतिहास रचला. 

gurinder sandhu
Australiaमध्ये धमाल करतोय भारतीय वंशाचा हा खेळाडू 
थोडं पण कामाचं
  • गुरिंदरच्या गोलंदाजीच्या जोरावर सिडनी थंडर्सने पर्थ स्कोचर्सला ६ विकेटनी हरवले.
  • गुरिंदरने आपल्या दोन ओव्हरच्या तीन बॉलवर हॅटट्रिक घेतली.
  • त्याने पर्थ स्कोचर्सच्या कोलिन मुन्रो, एरॉन हार्डी आणि लॉरी इव्हान्सची विकेट घेतली.

मुंबई: ऑस्ट्रेलिया (Australia)च्या बिग बॅश लीग (Big Bash League)मध्ये भारतीय वंशाचा खेळाडू गुरिंदर सिंह संधू(Gurinder Singh Sandhu) चा जलवा पाहायला मिळत आहे. सिडनी थंडर्सच्या गुरिंदर सिंह संधूने पर्थ स्कोचर्सविरुद्धच्या सामन्यात हॅटट्रिक घेत इतिहास रचला. गुरिंदरची ऑस्ट्रेलियामध्ये ही तिसरी हॅटट्रिक आहे. तसेच बीबीएलमध्ये ही पहिली. त्याने याआधी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये दोन हॅटट्रिक घेतल्या आहेत असे करणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. gurinder sandhu took hattrick in australia and create history

गुरूवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात गुरिंदरच्या गोलंदाजीच्या जोरावर सिडनी थंडर्सने पर्थ स्कोचर्सला ६ विकेटनी हरवले. गुरिंदरने आपल्या दोन ओव्हरच्या तीन बॉलवर हॅटट्रिक घेतली. त्याने पर्थ स्कोचर्सच्या कोलिन मुन्रो, एरॉन हार्डी आणि लॉरी इव्हान्सची विकेट घेतली. गुरिंदरने डावाच्या १२व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर मुन्रोला पॅव्हेलियनमध्ये धाडले. यानंतर गुरिंदर १४वी ओव्हर करण्यासाठी आला. पहिल्या बॉलमध्ये त्याने हार्डी आणि दुसऱ्या बॉलवर त्याने लॉरीला बाद केले. अशा पद्धतीने दोन ओव्हरमध्ये त्याने आपली हॅटट्रिक पूर्ण केली. 

गुरिंदर बीबीएलमध्ये सिडनी संघासाठी हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याने ४ ओव्हर टाकल्या. यात त्याने २२ धावा देताना ४ विकेट मिळवल्या. गुरिंदरने याआधी मार्श कप २०१८ आणि २०२१मध्येही हॅटट्रिक घेतली आहे. 

ऑस्ट्रेलियासाठी खेळला आहे वनडे सामना

गुरिंदरच्या आई-वडिांचा जन्म पंजाबमध्ये झाला होता. संधू ऑस्ट्रेलियासाठीही वनडे सामना खेळला आहे. जानेवारी २०१५मध्ये तो वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी खेळणारा भारतीय वंशाचा पहिला खेळाडू ठरला होता. संधूने आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये दोन वनडे सामने खेळले आहेत ययात त्याने ३ विकेट घेतल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी