चीनमध्ये कोरोना संकट, एशियन गेम्स २०२३ पर्यंत पुढे ढकलले

Hangzhou Asian Games Postponed Amid Coronavirus Scare In China : चीनच्या हांगझोउ शहरात १० ते २५ सप्टेंबर २०२२ या कालावधीत होणार असलेले एशियन गेम्स २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत.

Hangzhou Asian Games Postponed Amid Coronavirus Scare In China
एशियन गेम्स २०२३ पर्यंत पुढे ढकलले  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • चीनमध्ये कोरोना संकट
  • एशियन गेम्स २०२३ पर्यंत पुढे ढकलले
  • एशियन गेम्स प्रमाणेच वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स पण २०२३ पर्यंत पुढे ढकलले जाण्याची शक्यता

Hangzhou Asian Games Postponed Amid Coronavirus Scare In China : हांगझोउ : चीनच्या हांगझोउ शहरात १० ते २५ सप्टेंबर २०२२ या कालावधीत होणार असलेले एशियन गेम्स २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत. कोरोना संकट चीनमध्ये वेगाने पसरत आहे. यामुळे एशियन गेम्स पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे आयोजकांनी सांगितले.

एशियन गेम्सचा १९वा सीझन चीनमध्ये होणार होता. हा सीझन आता २०२२ ऐवजी २०२३ मध्ये होणार आहे. एशियन गेम्सच्या आयोजनाच्या सुधारित तारखा कोरोना संकटाचा आढावा घेऊन काही दिवसांनी जाहीर करणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

चीनमध्ये काही महिन्यांपूर्वी विंटर ऑलिम्पिक आणि पॅरालम्पिक पार पडले. या दोन स्पर्धा झाल्या आणि चीनमध्ये पुन्हा वेगाने कोरोना पसरण्यास सुरुवात झाली. यामुळे आयोजकांनी एशियन गेम्स पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. 

चीनमध्ये २६ जून ते ७ जुलै २०२२ या कालावधीत वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स होणार आहेत. एशियन गेम्स प्रमाणेच वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स पण २०२३ पर्यंत पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. याआधी वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स २०२१ मध्ये होणार होते. पण कोरोना संकटामुळे २०२२ मध्ये वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्सचे आयोजन करण्याचा निर्णय झाला. आता आयोजनाच्या आधीच चीनमध्ये कोरोना पसरू लागल्यामुळे पुन्हा एकदा वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स संकटात सापडण्याची चिन्हं दिसत आहेत. 

चीन सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार चीनमध्ये १०.७ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे चीनमध्ये ५ हजार १५३ मृत्यू झाले आहेत. कोरोना संकट थोपविण्यासाठी चीनमध्ये झिरो कोविड पॉलिसी अर्थात शून्य कोरोना रुग्ण धोरण कठोरपणे राबविले जात आहे. या अंतर्गत एखादा कोरोना रुग्ण आढळला तरी संपूर्ण शहरात कडक लॉकडाऊन करून मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. चीनच्या या धोरणामुळे शांघाय हे चीनमधील आर्थिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे असलेले शहर मागील काही दिवसांपासून लॉकडाऊनमध्ये आहे. सततच्या लॉकडाऊनमुळे शांघायचे नागरिक वैतागले आहेत. काही ठिकाणी नागरिक आणि स्थानिक पोलीस यांच्यात संघर्ष झाल्याचे वृत्त आहे. पोलीस अतिरिक्त कुमक मागवून आणि बळाचा वापर करून ठिकठिकाणी कठोरपणे लॉकडाऊन राबवत आहेत. चीनमध्ये कोरोनाबाधीत आढळल्यास संबंधित व्यक्तीला घरच्यांपासून दूर करून क्वारंटाइन केले जात आहे. घरातल्यांना त्यांच्या घरात अथवा क्वारंटाइन सेंटरवर ठेवून तिथे क्वारंटाइन केले जात आहे. नागरिकांचा चीन सरकारच्या या कठोर धोरणाला विरोध होऊ लागला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी