Happy Bday Virat Kohli : 'रन मशीन' कोहलीचा आज ३३ वा वाढदिवस, विराटकडून स्कॉटलंडविरुध्द अविस्मरणीय खेळीची अपेक्षा

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 05, 2021 | 11:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आज त्याचा 33 वा वाढदिवस आहे. कोहली वाढदिवसाच्या दिवशी मैदानात उतरला तर देशवासीयांना त्याच्याकडून विस्मरणीय खेळीची अपेक्षा असणार आहे.

Happy Bday Virat Kohli: 'Run Machine' Kohli's 33rd birthday today, Virat expects an unforgettable game against Scotland,
Happy Bday Virat Kohli : 'रन मशीन' कोहलीचा आज ३३ वा वाढदिवस, विराटकडून स्कॉटलंडविरुध्द अविस्मरणीय खेळीची अपेक्षा,   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • विराट कोहली आज त्याचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे
  • विराट कोहलीने त्याच्या कारकिर्दीत अनेक विक्रम रचले आणि तोडले
  • विराट कोहली आज स्कॉटलंडविरुद्ध खेळणार आहे.

Virat Kohli birthday मुंबई : टीम इंडिया (Team India) चा  कर्णधार विराट कोहली (Captain Virat Kohli) आज 33 वा वाढदिवस आहे. कोहलीचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 रोजी देशाची राजधानी दिल्लीत झाला. 13 वर्षांच्या आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत (international career) कोहलीने फलंदाज आणि कर्णधार म्हणून अनेक विक्रम रचले आणि तोडले. यामुळेच कोहलीचे नाव क्रिकेट (Cricket) जगतात महान फलंदाज आणि कर्णधारांमध्ये घेतले जाते. मात्र, कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आतापर्यंत एकही आयसीसी विजेतेपद जिंकलेले नाही आणि ही कसक दूर करण्यासाठी तो सध्या यूएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकात व्यस्त आहे. (Happy Bday Virat Kohli: 'Run Machine' Kohli's 33rd birthday today,)

T20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीत आज भारतीय संघ स्कॉटलंडशी खेळणार आहे. टीम इंडिया आपला कर्णधार विराट कोहलीला मोठा विजय भेट देऊ इच्छित आहे, तर चाहत्यांना कोहलीची जुनी आक्रमकतेची झलक पाहायची आहे. विराट कोहलीलाही वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी एक विस्मरणीय खेळी खेळायला आवडेल. पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक झळकावून कोहलीने आपल्या फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले होते, पण त्यानंतर तो न्यूझीलंडविरुद्ध प्रभावी ठरला नाही आणि अफगाणिस्तानविरुद्ध त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही.

अतुलनीय कारकीर्द

विराट कोहलीची कारकीर्द अतुलनीय आहे. त्याने आतापर्यंत 96 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 27 शतके आणि अर्धशतकांच्या मदतीने 7765 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ५१.०८ आहे. त्याच वेळी, कोहलीने आतापर्यंत 254 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 43 शतके आणि 62 अर्धशतकांच्या मदतीने 12169 धावा केल्या आहेत. वनडेमध्ये कोहलीची सरासरी ५६.५० आहे. याशिवाय कोहलीने 93 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 29 अर्धशतकांच्या मदतीने 3225 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी ५२.०१ होती. कोहलीची आकडेवारी त्याच्या महानतेची ओळख देते.

सचिननंतर सर्वाधिक शतके करणारा एकमेव फलंदाज

सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत 100 आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. त्याने 51 कसोटी आणि 49 एकदिवसीय शतके झळकावली. सचिन हा कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडू आहे. मात्र, कोहली भारताच्या माजी फलंदाजाचा वनडे शतकाचा विक्रम मोडण्याच्या जवळ पोहोचला आहे. सचिननंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा कोहली हा एकमेव फलंदाज आहे. भारतीय कर्णधार ज्या लयीत फलंदाजी करतो आणि शतके झळकावतो, तो आपल्या पुढील वाढदिवसापूर्वी ही कामगिरी करू शकतो. सध्या कोहलीच्या नावावर 43 वनडे शतके आहेत आणि त्याला फक्त 7 शतकांची गरज आहे. कोहलीला असे करण्यात यश आले तर ५० वनडे शतके झळकावणारा तो पहिला क्रिकेटर बनेल.

सचिनचा विक्रम यापूर्वीच मोडला 

'रन मशीन' कोहलीने यापूर्वीच सचिनचा मजबूत विक्रम मोडला आहे. सचिनला मागे टाकत त्याने वनडेमध्ये सर्वात जलद 10,000 धावा पूर्ण करण्याचा विश्वविक्रम केला होता. कोहलीने 213व्या वनडेच्या 205व्या डावात हा पराक्रम केला, तर सचिनने 259 डावात 10,000 धावा केल्या. सर्वात कमी चेंडूंचा सामना करत 10 हजार धावा करण्यातही कोहली अव्वल आहे. त्याने 10813 चेंडूत हे स्थान गाठले.

 
दोन वर्षात एकही शतक नाही

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली एकेकाळी शतकी खेळी करत होता, मात्र गेल्या दोन वर्षांत त्याच्या बॅटमधून एकही शतक झळकलेले नाही. कोहलीचे शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध होते. तेव्हापासून कोहलीचे चाहते शतक झळकावून मन प्रसन्न करण्यासाठी वाट पाहत आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणं अजिबात सोपं नसलं तरी चाहत्यांना आज कोहलीकडून खास खेळीची नक्कीच अपेक्षा असेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी