Harbhajan singh: १६०० धावा केल्यानंतरही नाही मिळाली संधी, हरभजन म्हणाला- लाज बाळगा

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 10, 2021 | 16:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

team india announcementबीसीसीआयने एक दिवस आधी न्यूझीलंडविरुद्ध ३ टी-२० मालिकेसाठी आणि दक्षिण आफ्रिकेसाठी इंडिया एची घोषणा केली. मात्र दोन्ही संघांमध्ये सौराष्ट्रचा फलंदाज शेल्डन जॅक्शनला पुन्हा एकदा डावलण्यात आले.  

sheldon jackson
१६०० धावा केल्यानंतरही नाही मिळाली संधी, हरभजन म्हणाला... 
थोडं पण कामाचं
  • गेल्या दोन रणजी हंगामात १६०० धावा करणाऱ्या जॅक्सनला इंडिया एमध्येही निवडण्यात आले नाही.
  • यावरून हरभजन सिंग चांगलाच भडकला आहे. त्याने ट्वीट करून निवड ममितीवर सवाल उपस्थित केले आहेत. 
  • जॅक्सनची बॅट सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतही चांगलीच तळपत आहे.

मुंबई: बीसीसीआयने(bcci) एक दिवस आधी न्यूझीलंडविरुद्ध ३ टी-२० मालिका आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी इंडिया एची घोषणा केली. मात्र दोन्ही संघांमध्ये घरगुती स्तरावर क्रिकेटच्या धावांचा मोठा स्कोर करणारा सौराष्ट्रचा फलंदाज शेल्डन जॅक्सनला (Sheldon Jackso) निवड समितीने पुन्हा एकदा नाकारले. गेल्या दोन रणजी हंगामात १६०० धावा करणाऱ्या जॅक्सनला इंडिया एमध्येही निवडण्यात आले नाही. यावरून हरभजन सिंग( harbhajan singh) चांगलाच भडकला आहे. त्याने ट्वीट करून निवड ममितीवर(selectors) सवाल उपस्थित केले आहेत. harbhajan singh angry for not selecting sheldon jackson

हरभजनने लिहिले, २०१८-१९ता रणजीचा हंगामा ८५४ धावा आणि २०१९-२०मध्ये ८०९धावा. तसेच संघाला चॅम्पियनही बनवले. यावर्षीही जबरदस्त फॉर्म. त्यानंतरही टीम इंडिया ए साठी निवड नाही. काय निवड समिती सांगू शकते का की रन बनवण्याशिवाय त्याने काय करावे ज्यामुळे त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळेल. हे खरंच लज्जास्पद आहे. 

जॅक्सनचे वय येतेय आ

न्यूझीलंड मालिका आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्ययासाठी निवड समितीने त्या खेळाडूंना सामील केले जे युवा आहेत आणि भविष्यात भारताकडून खेळू शकतात. जॅक्सन सध्या ३५ वर्षांचा आहे. हीच एक बाब असावी जी निवडीच्या आड येत असेल. मात्र ज्याप्रमाणे घरगुती क्रिकेटमध्ये हा फलंदाज खोऱ्याने धावा काढत असेल तर जॅक्सनला न निवडण्यावरून नक्कीच सवाल उभे राहतील. 

जॅक्सनची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सलग तीन अर्धशतके

जॅक्सनची बॅट सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतही चांगलीच तळपत आहे. गेल्या ३ सामन्यात त्याने ६७, ७० आणि ७९ धावांची खेळी केली. यात दोन वेळा तो नाबाद परतला. याशिवाय जॅक्सनने ५०च्या सरासरीने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ५६३४ धावा केल्या. जॅक्सनने लिस्ट ए सामन्यातील ६० सामन्यात २०९६ धावा केल्यात. तर ६४ टी-२०मध्ये या विकेटकीपर फलंदाजाने १२१च्या स्ट्राईक रेटने १४६१ धावा ठोकल्यात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी