Harbhajan Singh: हरभजनचा धोनीवर मोठा आरोप

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 31, 2021 | 17:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

Harbhajan Singh on MS Dhoni: भारतीय संघाचा माजी ऑफ स्पिनर हरभजन सिंग क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आता खुलेपणाने बोलत आहे. त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर मोठे आरोप लावले आहेत. 

harbhajan singh
Harbhajan Singh: हरभजनचा धोनीवर मोठा आरोप 
थोडं पण कामाचं
  • हरभजन सिंगने २४ डिसेंबरला निवृ्त्ती घेतली. 
  • भज्जीने कसोटी क्रिकेटमध्ये ४१७ विकेट घेतल्या.

मुंबई: स्टार ऑफ स्पिनर असलेला हरभजन सिंगहने(harbhajan singh) नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून(international cricket retirement) निवृत्ती घेतली. निवृत्ती घेतल्यानंतर आता हरभजन सिंग खुलेपणाने समोर आला आहे. त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर(ms dhoni) मोठे आरोप केले आहेत. हरभजन सिंगचे म्हणणे आहे की त्याला संघातून का बाहेर करण्यात आले याचे कारण सांगितले नाही. Harbhajan singh blame on Mahendra singh dhoni

हरभजनने इंडिया टीव्हीला सांगितले, मी ३१ वर्षांचा होतो. तेव्हा मी कसोटी क्रिकेटमध्ये ४०० विकेट मिळवल्या होत्या. जर मी ३१व्या वयात ४०० विकेट घेत असेन तर पुढील ८-९ महिन्यांत मी कमीत कमी १०० पेक्षा जास्त विकेट घेऊ शकत होतो. मात्र यानंतर मला जास्त सामन्यांमध्ये खेळवले नाही. विशेष म्हणजे मला सिलेक्टही केले जात नव्हते. 

माझ्याशी कोणाला प्रॉब्लेम होता माहीत नाही

भज्जीने सांगितले की ज्या खेळाडूने ४०० विकेट घेतल्या असतील त्याला बाहेर कसे बसवले जाऊ शकते. ही हैराणजनक बाब आहे. याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. हकीकतमध्ये काय घडले? टीममध्ये मी राहिल्याने कोणाला प्रॉब्लेम होता? या सर्व गोष्टींनी मी हैराण आहे. 

धोनीने हरभजनला उत्तर दिले नाही. 

हरभजनने सांगितले की मी माझे म्हणणे कर्णधार महेंद्रसिंग धोनीसमोर ठेवले मात्र मला कोणतेही उत्तर मिळाले नाही. तेव्हा मला समजले की मला बाहेर करण्याचे कारण सांगितले जाणार नाही. यामागे कोण आहे हे ही माहीत नाही. जेव्हा सतत विचारल्यानंतरही उत्तर नाही मिळाले तेव्हा मी विचारणेच सोडून दिले. 

कसोटीत हरभजनच्या ४१७ विकेट

निवृत्तीची घोषणा करताना ४१ वर्षीय हरभजनने लिहिले होते, मी त्या खेळाला अलविदा म्हणत आहे ज्याने मला आयुष्यात सर्वकाही दिले. सर्व चांगल्या गोष्टीही संपतात. मी त्या सर्वांचे आभार मानतो ज्यांनी मला २३ वर्षाच्या मोठ्या प्रवासातत चांगले आणि अविस्मरणीय क्षण दिले. हरभजनने आपल्या शानदार करिअरदरम्यान १०३ कसोटीत ४१७ विकेट, २३६ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २६९ आणि २८ टी-२० सामन्यांमध्ये २५ विकेट घेतल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी