हरभजन सिंगचा खुलासा, सांगितले CSKसाठी का खेळला नव्हता आयपीएल २०२०

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Apr 01, 2021 | 18:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

आयपीएल २०२०मधून दूर झाल्यानंतर हरभजन सिंगने आयपीएलच्या नव्या हंगामात खुलासा केला की तो गेल्या आयपीएलमध्ये सीएसकेकडून का खेळला नव्हता. 

harbhajan singh
हरभजन सिंगचा खुलासा, सांगितले CSKसाठी का खेळला नव्हता आयपीएल २०२० 

थोडं पण कामाचं

  • केकआरसाठी आयपीएलमध्ये खेळण्यापूर्वी  खुलासा केला आहे की गेल्या हंगामात त्याने स्पर्धेबाहेर जाण्याचा निर्णय का घेतला होता. 
  • क्रिकेटमध्ये सक्रिय असण्याबाबत हरभजन सिंग म्हणाला, हा प्रश्न मला यासाठी विचारला जातो कारण मी खूप दिवसांपासून क्रिकेट खेळलेलो नाही.
  • ९ एप्रिल २०२१ ते ३० मे २०२१ या कालावधीत भारतात आयपीएल स्पर्धेचे आयोजन होणार आहे.

मुंबई: क्रिकेटच्या टूर्नामेंटसाठी भारताचा स्पिनर हरभजन सिंग पहिल्यांदा बायोबबलचा भाग होईल. कारण त्याने वैयक्तिक कारणामुळे गेल्या हंगामात तो स्पर्धेबाहेर गेला होता. आता या दिग्गज क्रिकेटरने कोलकाता नाईट रायडर्स म्हणजेच केकआरसाठी आयपीएलमध्ये खेळण्यापूर्वी  खुलासा केला आहे की गेल्या हंगामात त्याने स्पर्धेबाहेर जाण्याचा निर्णय का घेतला होता. 

हरभजन सिंगने न्यूज एजन्सीला सांगितले की, गेल्या वर्षी जेव्हा आयपीएलचे आयोजन झाले होते तेव्हा भारतात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात विषाणू वाढत होते. मी आपल्या कुटुंबाबात चिंतेत होतो. तसेच भारतात आल्यानंतर केल्या जाणाऱ्या कठीण क्वारंटाईनबद्दलही. मात्र या वर्षी ही स्पर्धा भारतात होत आहे आणि आता न्यू नॉर्मलमध्ये येण्याची सवय झाली आहे. तसेच कोरोनाची लसही आली आहे. याशिवाय माझ्या कुटुंबानेही मला साथ दिली. माझी पत्नी गीताने मला सांगितले की मला गेले पाहिजे आणि खेळले पाहिजे. 

क्रिकेटमध्ये सक्रिय असण्याबाबत हरभजन सिंग म्हणाला, हा प्रश्न मला यासाठी विचारला जातो कारण मी खूप दिवसांपासून क्रिकेट खेळलेलो नाही. यासाठी संघ लिलावात बचावात्मक राहिले आणि माझ्यासाठी त्यांना बोली लावायची नव्हती. मात्र मला तुम्हाला लक्षात आणून द्यायचे आहे की जेव्ह २०१९मध्ये आयपीएलमध्ये सीएसकेसाठी चांगली कामगिरी केली होती तेव्हा मी डोमेस्टिक क्रिकेट खेळलो नव्हतो. मी कँपमध्ये आलो, तयारी केली आणि सामन्यात आलो. 

९ एप्रिल २०२१ ते ३० मे २०२१ या कालावधीत भारतात आयपीएल स्पर्धेचे आयोजन होणार आहे. हा इंडियन प्रिमियर लीग स्पर्धेचा चौदावा हंगाम आहे. आयपीएलच्या चौदाव्या हंगामात अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या शहरांमध्ये सामने होतील. अहमदाबादमध्ये होणार असलेले आयपीएलचे सर्व सामने सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलातील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम येथे होणार आहेत. स्पर्धेचा पहिला सामना ९ एप्रिल रोजी चेन्नईत खेळवला जाणार आहे.

प्ले ऑफ राउंडचे आठ, क्वालिफायर राउंडचे दोन, एलिमिनेटर राउंडचा एक आणि फायनल राउंडचा एक असे बारा सामने अहमदाबादमध्ये होणार आहेत. बंगळुरू, चेन्नई, मुंबई आणि कोलकाता या शहरांमध्ये प्ले ऑफ राउंडचे प्रत्येकी दहा सामने होतील. दिल्लीत प्ले ऑफ राउंडचे आठ सामने होणार आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी