Harbhajan singh: हरभजन सिंगने मुंबईत आपले घर विकले, पाहा किती करोड रूपये मिळाले

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 24, 2021 | 16:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

mumbai apartment: हरभजन सिंग सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतो आणि आपल्या चाहत्यांशी नेहमी जोडलेला असतो. अशीही बातमी समोर येत आहे की हरभजन सिंगे नुकतीच मुंबईतील अपार्टमेंट १७.५८ कोटी रूपयांना विकला आहे. 

harbhajan singh
Harbhajan singh: हरभजनने इतक्या कोटींना विकले मुंबईतील घर 
थोडं पण कामाचं
  • भज्जीने कोट्यावधी रूपयांना विकले अपार्टमेंट
  • २०१७मध्ये खरेदी केला होता अपार्टमेंट

मुंबई: भारताचा दिग्गज ऑफ स्पिनर हरभजन सिंग(harbhajan singh) चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि त्याचे फॅन फॉलोईंगही खूप जबरदस्त आहे. हरभजन सिंग सोशल मीडियावर(social media) खूप अॅक्टिव्ह असतो आणि आपल्या चाहत्यांशी नेहमी जोडलेला असतो. जॅपकी डॉट कॉमला मिळालेल्या माहितीनुसार ही बातमी समोर आली आहे हरभजन सिंगने नुकताच मुंबईतील(mumbai) आपली एक अपार्टमेंट(apartment) १७.५८  कोटी रूपयांना विकला. Harbhajan singh sell his mumbai apartment

भज्जीने कोट्यावधी रूपयांना विकला अपार्टमेंट

मिळालेल्या माहितीनुसार खरेदीदार जेबीसी इंटरनॅशनल एलएलपी आहे आणि प्रॉपर्टीची विक्रीची तारीख १८ नोव्हेंबर २०२१ला रजिस्टर्ड करण्यात आली होती. मनीकंट्रोलने जेबीी इंटरनॅशनलचा पार्टनर नीरज गोएंकाशी संपर्क केला होता. या अपार्टमेंटचा एरिया २,८३० स्क्वे फूट इतका आहे. 

२०१७मध्ये खरेदी केली होती अपार्टमेंट

ही अपार्टमेंट मुंबईच्या अंधेरी वेस्टमधील रुस्तमजी एलिमेंट्स नावाच्या प्रोजेक्टच्या नवव्या मजल्यावर स्थित आहे. कागदपत्रांमध्ये दाखवले गेले आहे की खरेदीदाराने ८७.९ लाख रूपयांची स्टँप ड्युटी भरली होती. हरभजन सिंगने डिसेंबर २०१७मध्ये अपार्टमेंट खरेदी केला होता. मार्च २०१८मध्ये याला १४.५ कोटी रूपयांना रजिस्टर्ड करण्यात आले होते. एका अन्य क्रिकेटर श्रेयस अय्यरने सप्टेंबर २०२०मध्ये लोढा वर्ल्ड क्रेस्, मुंबईमध्ये एक युनिट खरेदी केले होते. वर्ल्ड टॉवर्समध्ये २,६१८ स्क्वे फूट इतका एरिया आहे. ही अपार्टमेंट लोअर परेलमध्ये स्थित आहे. येथे ११.८५ कोटी रूपयांना खरेदी केले होते. 

हरभजन सिंगचे क्रिकेट करिअर

हरभजन सिंगने आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरची सुरूवात १९९८मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्याद्वारे केली होती. क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये हरभजनने १०३ सामन्यांमध्ये आतापर्यंत एकूण ४१७ विकेट घेतल्या होत्या. आपल्या टेस्ट करिअरमध्ये भज्जीने ५ वेळा एका कसोटी सामन्यात १० विकेट घेतल्या आहेत. तर २५ वेळा त्याने ५ पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. २०११मध्ये भज्जी भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये ४०० विकेट घेणारा पहिला ऑफ स्पिनर बनला होता. हरभजनने २००१मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध  पहिल्या हॅटट्रिकमध्ये रिकी पाँटिंग, अॅडम गिलख्रिस्ट आणि शेन वॉर्नसारखे मोठे विकेट मिळवत इतिहास रचला होता. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी