Harbhajan on Dhoni:बाकी १० जण काय लस्सी प्यायला गेले होते? धोनीला विजयाचे क्रेडिट दिल्याने भडकला हरभजन

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Apr 13, 2022 | 11:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

Harbhajan Singh: आयसीसी वर्ल्डकप २०११च्या विजयात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला क्रेडिट दिले गेल्याने दिग्गज ऑफ स्पिनर हरभजन सिंग भडकला आहे.

harbhajan singh
बाकी १० जण काय लस्सी प्यायला गेले होते? धोनीवरून हरभजन भडकला 
थोडं पण कामाचं
  • २०११मध्ये वर्ल्डकपबाबत बोलायचे झाल्यास त्या संपूर्ण वर्ल्डकपमध्ये ऑलराऊंडर युवराजची कामगिरी सर्वोत्कृष्ट राहिली होती.
  • अखेरच्या सामन्यातही गौतम गंभीर आणि युवराज सिंह यांची कामगिरी दमदार राहिली होती.
  • वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाचा भाग असलेल्या हरभजनने धोनीला क्रेडिट देण्यावरून नाराजी व्यक्त केली आहे.

ICC World Cup 2011 India Win: भारताने आतापर्यंत दोन वेळा आयसीसी वर्ल्डकप(icc world cup) जिंकला आहे. १९८३ मध्ये पहिल्यांदा आणि २०११मध्ये दुसऱ्यांदा. पहिल्या वर्ल्डकपचे विजेतेपद भारताने कपिल देव(kapil dev) यांच्या नेतृत्वात मिळवले होते. आणि दुसऱ्या वर्ल्डकप विजयाचे क्रेडिट माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला(ms dhoni) जाते. आता धोनीला या विजयाचे क्रेडिट देण्यावरून भारताचा माजी दिग्गज स्पिनर हरभजन सिंगने सवाल उपस्थित केले आहेत. Harbhajan singh take a dig on ms dhoni over credit of 2011 world cup win

अधिक वाचा - मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर

२०११मध्ये वर्ल्डकपबाबत बोलायचे झाल्यास त्या संपूर्ण वर्ल्डकपमध्ये ऑलराऊंडर युवराजची कामगिरी सर्वोत्कृष्ट राहिली होती. संघाला फायनलपर्यंत पोहोचवण्यात त्याचा मोठा हात होता. अखेरच्या सामन्यातही गौतम गंभीर आणि युवराज सिंह यांची कामगिरी दमदार राहिली होती. त्यांनी विजयात मोलाची भूमिका बजावली होती. मात्र विजयाची टोपी नेहमीच धोनीच्या डोक्यावर ठेवली जाते. यावरून आता हरभजनने सवाल उपस्थित केले आहेत. वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाचा भाग असलेल्या हरभजनने धोनीला क्रेडिट देण्यावरून नाराजी व्यक्त केली आहे.

 

लोकांवर व्यक्त केली नाराजी

धोनीला वर्ल्डकप विजयाचे क्रेडिट देण्यावरून हरभजन सिंगने नाराजी व्यक्त केली. त्याने स्टार स्पोर्ट्सवर म्हटले की ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकला तर प्रत्येक जण म्हणतो की त्या देशाने वर्ल्डकप जिंकला. २०११मध्ये जेव्हा भारताने वर्ल्डकप जिंकला तेव्हा लोकांनी म्हटले की धोनीने वर्ल्डकप जिंकला. जर हेच होते तर बाकी १० खेळाडू काय लस्सी प्यायला गेले होते. गौतम गंभीरने काय केले? इतरांनी काय केले?क्रिकेट हा टीम गेम आहे त्यामुळे जेव्हा सात-आठ खेळाडू चांगली करतात तेव्हा संघ पुढे जातो. 

अधिक वाचा - CNG पाच रुपयांनी तर PNG साडेचार रुपयांनी महागला

भारताने २८ वर्षांनी जिंकला वर्ल्डकप

भारताने २०११मध्ये तब्बल २८ वर्षांनी वर्ल्डकप जिंकला होता. अखेरच्या सामन्यात धोनीने ९१ धावा केल्या होत्या. या सामन्यात शेवटी नुवान कुलसेकराच्या बॉलवर ठोकलेला सिक्सर हा जगातील सर्वोत्कृष्ट फिनिशर म्हणून परिचित आहे. दरम्यान, विजयाचे संपूर्ण श्रेय धोनीला दिल्यावरून गौतम गंभीरनेही नाराजी व्यक्त केली आहे. त्याने दोन वर्षापूर्वी सोशल मीडिया पोस्टवर म्हटले होते, वर्ल्डकप २०११ हा संपूर्ण भारत, भारतीय संघ आणि सर्वांच्या पाठिंब्याने मिळवला गेला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी