हार्दिक पांड्या बनला बाबा, घरी पाहुण्याचे आगमन

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 30, 2020 | 16:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

Hardik pandya blessed baby boy: भारताचा धडाकेबाज क्रिकेटर हार्दिक पांड्याचे प्रमोशन झाले आहे. हार्दिक आता बाबा झाला आहे.

hardik pandya and natasha
हार्दिक पांड्या बनला बाबा, घरी पाहुण्याचे आगमन 

थोडं पण कामाचं

  • भारताचा धडाकेबाज क्रिकेटर आहे हार्दिक पांड्या
  • हार्दिक आणि नताशाने काही महिन्यांपूर्वी केले होते लग्न
  • सोशल मीडियावर हार्दिक पांड्याने शेअर केला फोटो

मुंबई: भारताचा धडाकेबाज क्रिकेटर हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टानकोविकने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. हार्दिकच्या कुटुंबात लहानग्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.हार्दिक पांड्याचे लाखो चाहते सोशल मीडियावरून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. हार्दिक पांड्याने या सुंदर क्षणाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच बाबा झाल्याचा आनंद त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

We are blessed with our baby boy ❤️

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Photographer- @rahuljhangiani Hardik’s stylist - @nikitajaisinghani Natasa’s stylist - @begborrowstealstudio

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

याआधी हार्दिक पांड्याने नताशासोबत फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की 'कमिंग सून'. हार्दिक पांड्या सोशल मीडियावर चांगला अॅक्टिव्ह असतो.नताशा आणि हार्दिक यांनी याआधी हिंट दिली होती की ते लवकरच एका बाळाला जन्म देणार आहेत. त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करताना लिहिले होते की,  मॉम टु बी नताशा, या खास क्षणासाठी उत्सुक आहोत. 

हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी जानेवारीत साखरपुडा केला होता. दुबईत दोघांचा साखरपुडा केला होता. याटवर हार्दिकने नताशाला अंगठी घालत प्रपोज केले होते. त्याचा हा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवरही शेअर केला होता. हार्दिक आणि नताशाने साखरपुडा केला याची माहिती कोणालाच नव्हती. त्याच्या घरच्यांनाही हे माहीत नव्हते. पांड्याचे वडिल याबाबत बोलताना म्हणाले होते की, त्यांनी साखरपुडा केला याची माहितीच नव्हती. नताशा चांगली मुलगी असून आम्ही तिला अनेकदा मुंबईत भेटलो आहोत. ते दुबईला सुट्टीवर गेले होते मात्र तेथे साखरपुडा करतील याची कल्पना नव्हती. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Forever yes ❤️ @hardikpandya93

A post shared by Nataša Stanković✨ (@natasastankovic__) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@hardikpandya93

A post shared by Nataša Stanković✨ (@natasastankovic__) on

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी