Hardik Pandya : हार्दिक पांड्या टी २० मध्ये डबल धमाका करणारा पहिला भारतीय

Hardik Pandya becomes first Indian Cricketer in T20I history who took 4 wickets and scored 50 plus runs : साउथम्पटन येथील द रोझ बाउलमध्ये झालेल्या टी २० मॅचमध्ये भारताच्या हार्दिक पांड्याने इंग्लंडविरुद्ध ५१ धावा केल्या तसेच अप्रतिम बॉलिंग करत इंग्लंडच्या ४ बॅटरना बाद केले.

Hardik Pandya becomes first Indian Cricketer in T20I history who took 4 wickets and scored 50 plus runs
Hardik Pandya : हार्दिक पांड्या टी २० मध्ये डबल धमाका करणारा पहिला भारतीय  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Hardik Pandya : हार्दिक पांड्या टी २० मध्ये डबल धमाका करणारा पहिला भारतीय
  • भारताच्या हार्दिक पांड्याने इंग्लंडविरुद्ध ५१ धावा केल्या
  • हार्दिकने अप्रतिम बॉलिंग करत इंग्लंडच्या ४ बॅटरना बाद केले

Hardik Pandya becomes first Indian Cricketer in T20I history who took 4 wickets and scored 50 plus runs : साउथम्पटन येथील द रोझ बाउलमध्ये झालेल्या टी २० मॅचमध्ये भारताच्या हार्दिक पांड्याने इंग्लंडविरुद्ध ५१ धावा केल्या तसेच अप्रतिम बॉलिंग करत इंग्लंडच्या ४ बॅटरना बाद केले. यामुळेच हार्दिक पांड्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या टी २० मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच झाला. एकाच आंतरराष्ट्रीय टी २० मॅच मध्ये बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही प्रकारात अप्रतिम कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याचा मान हार्दिक पांड्या याने पटकावला. 

हार्दिक पांड्याने ३३ बॉलमध्ये सहा फोर आणि एक सिक्स मारत १५४.५५ च्या स्ट्राईक रेटने ५१ धावा केल्या. तसेच चार ओव्हरमध्ये ३३ धावा देत इंग्लंडच्या चार बॅटरना बाद केले. 

हार्दिकने सलामीवीर जेसन रॉयला (४ धावा) हर्षल पटेलकरवी झेलबाद केले तर डेव्हिड मालनला (२१ धावा) क्लीनबोल्ड केले. यानंतर हार्दिकने लियाम लिव्हिंगस्टोनला शून्य धावांवर आणि सॅम करणला ४ धावांवर विकेटकीपर दिनेश कार्तिककरवी झेलबाद केले. इंग्लंडच्या चार प्रमुख बॅटरना बाद करून हार्दिकने प्रतिस्पर्ध्यांवर मोठा दबाव टाकला. या दबावातून बाहेर पडून धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची दमछाक झाली. अखेर इंग्लंडची टीम १९.३ ओव्हरमध्ये १४८ धावांपर्यंतच मजल मारू शकली. त्यांचे सर्व खेळाडू बाद झाले. भारताने इंग्लंड विरुद्धची पहिली टी २० मॅच ५० धावांनी जिंकली आणि तीन टी २० मॅचच्या सीरिजमध्ये १-० अशी आघाडी घेतली.

एका आंतरराष्ट्रीय टी २० मॅचमध्ये अर्धशतक (हाफ सेंच्युरी) आणि चार विकेट अशी कामगिरी करणारा हार्दिक पांड्या हा पहिला आंतरराष्ट्रीय खेळाडू झाला. तसेच एकाच आंतरराष्ट्रीय टी २० मॅच मध्ये बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही प्रकारात अप्रतिम कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू झाला. याआधी युवराज सिंहने एका आंतरराष्ट्रीय टी २० मध्ये अर्धशतक आणि तीन विकेट अशी कामगिरी केली होती. युवराजला मागे टाकून हार्दिकने आंतरराष्ट्रीय टी २० मध्ये नवी सर्वोच्च कामगिरी नोंदवली. टी २० क्रिकेटमध्ये पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला येऊन अर्धशतक करणारा हार्दिक पांड्या हा पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे.

हार्दिकला टी २० मध्ये पहिले अर्धशतक करण्यासाठी ६२ टी २० मॅच आणि साडेसहा वर्षांची वाट बघावी लागली. त्याने ऑस्ट्रेलियात २०१६ मध्ये अॅडलेड येथे टी २० क्रिकेटमध्य पदार्पण केले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी