Hardik Pandya Record : गांगुली-युवराज कधीच बनवू शकले नाहीत, असं रेकॉर्ड हार्दिक पंड्याच्या नावे, वाचा सविस्तर

एकाच सामन्यात अर्धशतक झळकावणे आणि त्याच सामन्यात चार किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत आता हार्दिक पंड्याचे नावही झळकले आहे. आशियाबाहेर हा विक्रम करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

Hardik Pandya Record
हार्दिक पंड्याच्या नावे नवं रेकॉर्ड  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • हार्दिक पंड्याने रचला नवा विक्रम
  • एकाच सामन्यात अर्धशतक आणि 4 किंवा अधिक विकेट्स
  • आशियाबाहेर विक्रम रचणारा पहिला भारतीय

Hardik Pandya Record : भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका रंगतदार अवस्थेत आहे. तिसऱ्या सामन्यात भारतानं इंग्लंडचा पाच विकेट्सनी पराभव केला. या विजयासह भारतानं मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. ऋषभ पंतची शानदार बॅटिंग आणि हार्दिक पंड्याच्या ऑलराउंड परफॉर्मन्समुळे भारताने तिसऱ्या सामन्यात बाजी मारली. हार्दिकनं या सामन्यात 55 चेंडूत 77 धावा केल्या. त्याचबरोबर त्याने 4 विकेट्सही घेतल्या. 

हार्दिकच्या नावे रेकॉर्ड

हार्दिक पंड्याच्या नावावर आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या विक्रमांची नोंद झाली आहे. एका वनडे सामन्यात 50 पेक्षा जास्त धावा बनवणारा आणि त्याच सामन्यात चार किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा पाचवा खेळाडू ठरला आहे. हार्दिक पंड्याअगोदर हा विक्रम के. श्रीकांत, सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली आणि युवराज सिंग यांच्या नावे आहे. मात्र हार्दिक पंड्या वगळता इतर सर्वांनी आशियात खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. आशिया खंडाबाहेर अशी कामगिरी करणारा हार्दिक पंड्या हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी सौरव गांगुली आणि युवराज सिंग यांनी प्रत्येकी दोन वेळा आशियात हा विक्रम रचला होता. 

अधिक वाचा - IND Vs Eng: Rishabh Pantने इंग्लंडच्या या गोलंदाजाकडून एकाच ओव्हरमध्ये घेतला संपूर्ण मालिकेचा बदला

एकाच सामन्यात अर्धशतक झळकावून 4 पेक्षा अधिक विकेट घेणारे खेळाडू

खेळाडू

कामगिरी

विरुद्ध आणि साल

ठिकाण

के. श्रीकांत

70 आणि 5/27

NZ, 1988

विशाखापट्टणम

सचिन तेंडुलकर

141 आणि 4/38

Aus, 1998

ढाका

सौरव गांगुली

130* आणि 4/21

SL, 1999

नागपूर

सौरव गांगुली

71* आणि 5/34

Zim, 2000

कानपूर

युवराज सिंग

118 आणि 4/28

Eng, 2008

इंदूर

युवराज सिंग

50* आणि 5/31

IRE, 2011

बंगळुरू

हार्दिक पंड्या

71 आणि 4/24

Eng, 2022

मॅन्चेस्टर

इंग्लंडमधील विक्रम

इंग्लंडमध्ये कुठल्याही एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावून चार किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत हार्दिकनं चौथं स्थान पटकावलं आहे. त्याच्यापूर्वी झिंबाब्वेच्या डंकन फ्लेचर (1983) आणि नील जॉन्सन (199) यांनी तर बांग्लादेशच्या शाकिब अल हसन (2019) यांनी हा विक्रम रचला होता. इंग्लंडविरोधात हा विकेट रचणारा तर हार्दिक पंड्या हा केवळ दुसरा खेळाडू ठरला आहे. त्यापूर्वी श्रीलंकेच्या अरविंदा डीसिल्व्हाने सिडनी क्रिकेट ग्राउंडवर इंग्लंडविरुद्ध अर्धशतक झळकावण्याचा आणि त्याच सामन्यात चारपेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा विक्रम रचला होता. 

अधिक वाचा - IND Vs Eng: Rishabh Pantने इंग्लंडच्या या गोलंदाजाकडून एकाच ओव्हरमध्ये घेतला संपूर्ण मालिकेचा बदला

सर्व प्रकारांत विक्रम

हार्दिक पंड्याने केवळ एकदिवसीय सामन्यातच नव्हे, तर टी-20 आणि कसोटीमध्येही हाच विक्रम रचला आहे. तिन्ही फॉर्मॅटमध्ये तितकीच प्रभावी कामगिरी करणारा हार्दिक पंड्या भारतीय क्रिकेटचा नवा तारा म्हणून चमकतो आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी