T20 World Cup: सेमीफायनल हरल्यानंतर हार्दिक पांड्या कोलमडला, केलं काळीज चिरणारं विधान

Hardik Pandya: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या टी-20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडकडून 10 विकेट्सने पराभूत झाल्यानंतर अक्षरश: कोलमडला आहे. यावेळी पांड्याने असं वक्तव्य केलंय की, ज्यामुळे जे चाहत्यांच्या हृदयाला फाडून टाकेल.

hardik pandya broke down badly after indias exit in semifinals this thing will rip peoples heart
सेमीफायनल हरल्यानंतर हार्दिक पांड्या कोलमडला, केलं काळीज चिरणारं विधान 
थोडं पण कामाचं
  • भारताचा टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव
  • विश्वचषकातील पराभव लागला भारताच्या जिव्हारी
  • पराभवानंतर हार्दिक पांड्या कोलमडला

T20 World Cup 2022: T20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाला इंग्लंडकडून 10 विकेटने पराभव स्विकारावा लागाला. हाच पराभव अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या फारच जिव्हारी लागला आहे. ज्यामुळे तो अक्षरश: कोलमडून गेला आहे. T20 विश्वचषक 2022 स्पर्धेतून रिकाम्या हाताने परतल्याने हार्दिक पांड्याला अतीव दु:ख झालं आहे. ज्याच्या भरात पांड्याने असे एक विधान केले आहे की, ज्याने चाहत्यांचंही हृदय पिळवटून निघालं आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या म्हणाला की तो 'तो अद्यापही धक्क्यातून सावरलेला नाही, दुखावला गेलाय आणि निराश आहे.' (hardik pandya broke down badly after indias exit in semifinals this thing will rip peoples heart)

उपांत्य फेरीत भारताच्या पराभवानंतर पांड्या खचला 

सेमीफायनलमध्ये हार्दिक पांड्याने 33 चेंडूत 63 धावांची शानदार खेळी केली. ज्यामुळे भारताला 6 बाद 168 धावांपर्यंत मजल मारता आली. पण इंग्लंडने हे लक्ष्य अवघ्या 16 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. ते देखील 10 गडी राखून. याच पराभवानंतर हार्दिक पांड्याने ट्विट केलं की, 'निराश, दुखावलोय, धक्का बसलाय.'

अधिक वाचा: Team India T20 WC:टीम इंडियाचे हे खेळाडू घेणार निवृत्ती, सुनील गावस्करांचा मोठा दावा

लोकांचं हृदय पिळवटून टाकणारं हार्दिक पांड्याचं वक्तव्य  

हार्दिक पांड्या म्हणाला, 'हा निकाल स्वीकारणे आपल्या सर्वांसाठी कठीण आहे. आम्ही आमच्या सहकारी खेळाडूंसोबतच्या नात्याचा पुरेपूर आनंद घेतला आहे, आम्ही प्रत्येक टप्प्यावर एकमेकांसाठी लढलो. आमच्या सपोर्ट स्टाफच्या अनेक महिन्यांच्या समर्पण आणि कठोर परिश्रमाबद्दल धन्यवाद.'

अधिक वाचा: Harbhajan Singh Demand: रोहित शर्माऐवजी ‘या’ खेळाडूला करा कॅप्टन, हरभजन सिंगची मागणी

आम्ही लढत राहू

हार्दिक पांड्याने पुढे असेही लिहिले, 'आमच्या चाहत्यांचे आभार, ज्यांनी आम्हाला सर्वत्र पाठिंबा दिला, आम्ही तुम्हा सर्वांचे आभारी आहोत. खरं तर असं व्हायला नको होतं, पण आम्ही लढत राहू.' असं ट्विटही पांड्याने यावेळी केलं आहे. 

दरम्यान, विश्वचषकानंतर भारताची पुढील मालिका ही न्यूझीलंडसोबत असणार आहे. ज्यामध्ये टीम इंडिया तीन टी-20 आणि तीन वनडे सामने खेळणार आहे. ही मालिका 18 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी