Hardik pandya: मायकेल वॉनच्या टीकेला हार्दिकने दिले सणसणीत उत्तर

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 16, 2022 | 17:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी20 वर्ल्ड कप 2022नंतर होणाऱ्या पहिल्या टी20 मालिकेआधी संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने मीडियाशी बातचीत केली. 

hardik pandya
मायकेल वॉनच्या टीकेला हार्दिकने दिले सणसणीत उत्तर 
थोडं पण कामाचं
  • टी20 वर्ल्ड कप 2022मध्ये सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर चहूबाजूंनी टीम इंडियावर टीका करण्यात आली.
  • यातील एक नाव म्हणजे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन.
  • त्याने टीम इंडिया आणि खेळाडूंची खिल्ली उडवली.

मुंबई:  टी20 वर्ल्ड कप 2022(t-20 world cup 2022,) संपल्यानंतर आता टीम इंडिया(team india) न्यूझीलंड दौऱ्यावर(new zealand tour) गेली असून या दौऱ्यात ते टी20 मालिका खेळणार आहेत. यावेळी संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे(hardik pandya) सोपवण्यात आले आहे. टी20 वर्ल्ड कप 2022मध्ये सेमीफायनलमध्ये(semifinal) पराभूत झाल्यानंतर चहूबाजूंनी टीम इंडियावर टीका करण्यात आली. खासकरून परदेशातील क्रिकेट दिग्गजांनीही टीका केली. यातील एक नाव म्हणजे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन(michael vaughan). त्याने टीम इंडिया आणि खेळाडूंची खिल्ली उडवली. जेव्हा हार्दिक पांड्याला याबाबत विचारण्यात आले तेव्हा त्याने सणसणीत उत्तर दिले. hardik pandya gives answer on michael vaughan statement

अधिक वाचा - आई करत होती डान्स मुलगा शूट करत होता रील

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने आपल्या कॉलममध्ये लिहिले होते की भारताने 2011मध्ये वनडे वर्ल्डकप जिंकल्यानंतर काहीच मिळवलेले नाही. तसेच मर्यादित षटकांच्या क्रिकेट इतिहासात अपेक्षेनुसार कामगिरी करण्यात ते नेहमीच अयशस्वी ठरले आहेत. टीम इंडियाचा ऑलराऊंडर आणि न्यूझीलंड दौऱ्यावरील कार्यवाहक कर्णधार हार्दिक पांड्याला जेव्हा मायकेल वॉनने केलेल्या टीकेबाबत सवाल करण्यात आला तेव्हा तो स्पष्टपणे म्हणाला की आम्हाला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. 

हार्दिक पांड्या, याबाबत बोलताना म्हणाला, मला नाही वाटतं की आम्हाला काही सिद्ध करण्याची गरज आहे. खराब खेळावर लोक टीका करणारच आम्ही याचा आदर करतो. खेळात प्रत्येकजण चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत असतो. आम्हाला कोणालाही काहीही सिद्ध करायची गरज नाही.

 

सेमीफायनलमध्ये पराभवाचा धक्का

टीम इंडियाला वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पराभवाचा धक्का बसला होता. टीम इंडियाने सुपर 12 स्टेजमधील पाचपैकी चार सामन्यात विजय मिळवला. मात्र सेमीफायनलमध्ये इंग्लंडने त्यांना मात दिली. या पराभवामुळे भारताचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न पुन्हा भंगले. 

असा आहे न्यूझीलंड दौरा

टी20 मालिका

18 नोव्हेंबर पहिली T20, वेलिंग्टन
20 नोव्हेंबर दुसरी T20, माउंट मौनगानुई
22 नोव्हेंबर तिसरी T20, ऑकलंड

अधिक वाचा - श्रद्धा हत्या प्रकरण: आफताबच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड

वनडे मालिका

25 नोव्हेंबर पहिली वनडे, ऑकलंड
27 नोव्हेंबर दुसरी वनडे एकदिवसीय, हॅमिल्टन
30 नोव्हेंबर तिसरी वने, क्राइस्टचर्च

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी