Dhoni: धोनीमुळे हा क्रिकेटर आहे वर्ल्डकपचा भाग, नाहीतर गेला असता घरी - रिपोर्ट

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 29, 2021 | 17:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

Hardik Pandya selection row: टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याच्या जागेबाबत सातत्याने चर्चा सुरू आहे. रिपोर्टनुसार जर एमएस धोनीचा पाठिंबा त्याला मिळाला नसता तर तो टी-२० वर्ल्डकपचा भाग नसता. 

pandya
धोनीमुळे हा क्रिकेटर आहे वर्ल्डकपचा भाग, नाहीतर... 
थोडं पण कामाचं
  • हार्दिक पांड्या टी-२० वर्ल्डकपमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.. 
  • हार्दिक पांड्या ऑलराऊंडर असतानाही गेल्या दोन वर्षांपासून केवळ फलंदाजी करतोय
  • रिपोर्टनुसार धोनीचा हार्दिकला पाठिंबा मिळाला होता. 

मुंबई: टीम इंडियाला(team india) टी-२० वर्ल्डकप(t-20 world cup) स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानच्या(pakistan) हातून पराभव पत्करावा लागला. यानंतर टीम निवडीबाबत अनेक प्रकारचे सवाल उपस्थित केले जात आहेत. यात हार्दिक पांड्याचाही(hardik pandya) समावेश आहे. गेल्या दोन वर्षांपासून कमरेची सर्जरी झाल्याकारणाने हार्दिक पांड्या सतत गोलंदाजी(bowling) करत नाहीये तर फलंदाजीतही त्याची कामगिरी खास राहिलेली नाही. hardik pandya in world cup team because of ms dhoni

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार ही माहिती मिळाली आहे की बीसीसीआयआयपीएलनंतर हार्दिक पांड्याला घरी पाठवत होते मात्र धोनीच्या सांगण्याने त्याला थांबवण्यात आले. धोनीने हार्दिक पांड्याच्या फिनिशिंगच्या शैलीचे कौतुक करताना त्याला संघाचा भाग बनवण्यास सांगितले होते. धोनी सध्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा मेंटर आहे. 

एका सूत्राच्या हवाल्याने टीओईला सांगितले, हे खरे आहे की निवड समितीला हार्दिक पांड्याला घरी पाठवायचे होते कारण आयपीएलमध्ये त्याने गोलंदाजी केली नव्हती. मात्र एमएस धोनीने त्याच्या फिनिशिंग शैलीचे कौतुक केले होते. हार्दिक पांड्याचा फिटनेस गेल्या सहा महिन्यांपासूनचे रहस्य आहे. आता समोर आले आहे की त्याला खांद्याला दुखापत झाली आहे. हार्दिकमुळे दुसऱ्या एखाद्या फिट खेळाडूला संधी मिळत नाही आहे. तुम्ही अनफिट खेळाडूसोबत खेळत आहात जो संघाच्या उपयोगीही येत नाही आहे. हे योग्य नाही. त्याच्यामुळे इतर लोकांकडे लक्ष दिलेनाही जे चांगली कामगिरी करत आहेत. 

अनेकांनी सल्ला दिला की हार्दिक पांड्याच्या जागी शार्दूल ठाकूरला सामील करण्यात यावे. यामुळे भारतीय संघाला खालच्या क्रमवारीत एक फलंदाज मिळेल सोबतच सहाव्या गोलंदाजाचीही चिंता संपेल. 

संदीप पाटील यांना समजले नाही की हार्दिकला संघात का सामील करण्यात आले. त्यांनी सांगितले,  त्याची प्लेईंग ११मध्ये निवड कोच आणि कर्णधारावर अवलंबून होती. बीसीसीआयलाच या बाबतीत माहित होते.जर एखादा खेळाडू फिट नसेल तर तर ती गोष्ट निवड समितीकडे येते. जर त्याने संपूर्ण आयपीएलमध्ये गोलंदाजी केली नाही तर निवडसमितीला निर्णय घ्यायला हवा होता. त्याला संघात सामील करण्याआधी फिटनेस टेस्ट घेणे गरजेचे होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी