IND vs WI:हार्दिक पांड्याने WIमध्ये रचला इतिहास, टी-२०मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 03, 2022 | 12:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

Hardik Pandya: ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात अशी कामगिरी केली की जी याआधी कोणत्याही भारतीय खेळाडूने केली नव्हती. 

hardik pandya
IND vs WI: जे कोणालाच जमले नाही ते हार्दिकने करून दाखवले 
थोडं पण कामाचं
  • हार्दिक पांड्याने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात ४ ओव्हर गोलंदाजी करत त्याने ४.७५च्या इकॉनॉमीने केवळ १९ धावा खर्च केल्या आणि १ विकेट मिळवला.
  • ही विकेट मिळवाना हार्दिक पांड्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या ५० विकेट पूर्ण केल्या.
  • तसेच जबरदस्त रेकॉर्ड आपल्या नावे केला.

मुंबई: टीम इंडियाचा विस्फोटक ऑलराऊंडर हार्दिक पांड्या(team india allrouder hardik pandya) सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. आयपीएल २०२२(ipl 2022) पासून ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची रेकॉर्डब्रेक(recordbreak) कामगिरी सुरू आहे. मंगळवारी २ ऑगस्टला सेंट किट्सच्या वॉर्नर पार्कमध्ये विंडीजविरुद्ध(india vs west indies) खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यातही हार्दिक पांड्याने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला. त्याने या सामन्यात अशी कामगिरी केली जी याआधी कोणत्याच भारतीय खेळाडूने केली नव्हती. Hardik pandya make a record in india vs west indies match 

अधिक वाचा - मुंबईकरांनो काळजी घ्या,स्वाइन फ्लू आणि मलेरियाचा वाढतोय कहर

हार्दिक पांड्याने रचला इतिहास

हार्दिक पांड्याने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात ४ ओव्हर गोलंदाजी करत त्याने ४.७५च्या इकॉनॉमीने केवळ १९ धावा खर्च केल्या आणि १ विकेट मिळवला. ही विकेट मिळवाना हार्दिक पांड्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या ५० विकेट पूर्ण केल्या. तसेच जबरदस्त रेकॉर्ड आपल्या नावे केला. हार्दिक पांड्या भारताचा असा पहिला खेलाडू बनला आहे ज्याच्या नावावर टी-२० क्रिकेटमध्ये ५००पेक्षा जास्त धावा आहेत आणि ५० विकेट आहेत. हार्दिक ही कामगिरी करणारा जगातील ९वा खेळाडू ठरला आहे. 

भारतासाठी टी-२०मध्ये सर्वाधिक विकेट

हार्दिक पांड्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी ५० विकेट पूर्ण करणारा ६वा गोलंदाज ठरला आहे. याआधी ही कामगिरी युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, आर अश्विन  आणि रवींद्र जडेजाने केली आहे. तर भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांबाबत बोलायचे झाल्यास तो युझवेंद्र चहल आहे. युझवेंद्र चहलने भारतासाठी ६० टी-२० सामन्यात ७९ विकेट मिळवल्या आहेत. 

अधिक वाचा - मुंबईकरांनो पाणी वापरा जपून; १५ टक्के पाणी कपात

पांड्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट

हार्दिक पांड्या टी-२० वर्ल्डकप २०२१ नंतर टीम इंडियातून बाहेर होता. मात्र तो पुन्हा टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. हार्दिक पांड्याने भारतासाठी आतापर्यंत ६६ टी-२० सामन्यात २३.०३ च्या सरासरीने ८०६ धावा केल्या आहेत आणि ५० विकेट मिळवल्या आहेत. हार्दिक पांड्याने ६६ वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. यात त्याने १३८६ धावा आणि ६३ विकेट मिळवल्या आहेत. पांड्याने ११ कसोटीतही भारताचे प्रतिनिधित्व केले यात त्याने ५३२ धावा आणि १७ विकेट घेतल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी