Hardik pandya retires from test cricket: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या(hardik pandya) सध्या एनसीएमध्ये आहे आणि आपल्या फिटनेसवर(fitness) सातत्याने काम करत आहे. टी-२० वर्ल्डकप २०२१(t-20 world cup) दरम्यान हार्दिकला दुखापत झाली होती आणि त्यानंतरही तो प्लेईंग ११चा भाग होता. यावरून अनेक सवाल उपस्थित करण्यात आले होते. तसेच त्यानंतर त्याला एनसीएला जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. ज्यामुळे तो पूर्णपणे फिट होत संघात पुनरागमन करेल. या सर्व बाबींमध्ये आता अशी बातमी समोर येत आहे की टीम इंडियाचा हा स्टार ऑलराऊंडर आपल्या दुखापतीमुळे त्रस्त असल्याने क्रिकेटचा लांब फॉरमॅट म्हणजेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे. hardik pandya may be retires from test cricket
हार्दिक पांड्या आपल्या पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर फिटनेससाठी सातत्याने प्रयत्न करत आहे तो सध्या गोलंदाजी करू शकत नाही आहे. टी-२० वर्ल्डकपच्या सुरूवातीच्या सामन्यांमध्ये त्याने गोलंदाजी केली नव्हती आणि यावरून निवड समिती आणि त्याच्यावर जोरदार टीका झाली होती. यानंतर शेवटच्या दोन लीग सामन्यांमध्ये त्याने गोलंदाजी जरूर केली मात्र काही खास कामगिरी करू शकला नव्हता. आता इनसाईड स्पोर्टच्या रिपोर्टनुसार हार्दिक पांड्या कसोटी क्रिकेटला बाय बाय म्हणण्याबाबत विचार करत आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इनसाईड स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले, हार्दिक पांड्या पांढरा बॉलचे क्रिकेट आणि आयपीएलवर आपले लक्ष केंद्रित करण्याचा विचार करत आहे आणि त्यामुळे तो हे पाऊल उचलू शकतो. त्याने बीसीसीआयला अनौपचारिक पद्धतीने आपला हा विचार बोलून दाखवला. मात्र अधिकृतपणे याची कोणतीही घोषणा केलेली नाही.
हार्दिक पांड्याने २०१९८मध्ये आपला शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर तो कसोटी संघाबाहेर आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, तो कसोटी क्रिकेटमधून रिटायरमेंट घेण्याच्या विचारातआहे मात्र अधिकृतपणे त्याने ही माहिती दिलेली नाही. यामुळे तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर आपले लक्ष केंद्रित करू शकतो. सध्या हार्दिक कसोटी क्रिकेटच्या संघाचा भाग नाही आहे मात्र जर त्याने कसोटी क्रिकेट खेळणे सोडले तर निश्चितपणे हे मोठे नुकसान असेल आणि आम्हाला त्याचा बॅकअप शोधावा लागेल.