IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध हार्दिक पांड्याच बनणार टीम इंडियाचा कर्णधार!

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 24, 2022 | 13:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

Hardik pandya: एक टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर आहे जी कसोटी सामना खेळणार आहे. तर दुसरी टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर आहे जिथे दोन टी-२० सामने खेळणार आहे. 

hardik pandya
इंग्लंडविरुद्ध हार्दिक पांड्याच बनणार टीम इंडियाचा कर्णधार! 
थोडं पण कामाचं
  • भारत आणि इंग्लंड यांच्यात एक जुलैपासून खेळवली जाणार एकमेव कसोटी
  • इंग्लंडविरुद्ध सात जुलैपासून सुरू होणार तीन सामन्यांची टी-२० मालिका
  • भारत आणि आयर्लंड यांच्यात २६ आणि २८ जूनला खेळवले जाणार दोन टी-२० सामने

मुंबई: टीम इंडिया(team india) सध्या इंग्लंड दौऱ्यावर(england tour) आहे. भारत(india) आणि इंग्लंड(england) यांच्यात एक जुलैपासून कसोटी सामना खेळवला जाणार आहे. यासाठी टीम इंडियाचा सरावही सुरू झाला आहे. आजपासून लिसेस्टशायरविरुद्ध भारतीय संघाला चार दिवसांचा सराव सामना खेळायचा आहे. कसोटी सामन्यानंतर भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध तीन टी-२० सामनेही खेळायचे आहेत. यासाठी टीम इंडियाची अद्याप घोषणा झालेली नाही. यातच अशी बातमी पुढे येत आहे की भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाचे नेतृत्व हार्दिक पांड्याच्या(hardik pandya) हाती येऊ शकते.  म्हणजे मालिकेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह संघात नसतील. Hardik pandya may became captain on england tour

अधिक वाचा - नवरदेवाने केलेल्या अंधाधुंद फायरिंगमध्ये जवानाचा मृत्यू

कसोटी सामना संपल्यावर दोन दिवसांनी सुरू होणार टी-२० मालिका

इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडिया ३ टी-२० सामनेही खेळणार आहे. तर दुसरीकडे जी दुसरी टीम इंडिया आहे जी आयर्लंड दौऱ्यावर ते दोन टी-२० सामने खेळणार आहे. आयर्लंड दौऱ्यावर भारताचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे देण्यात आले आहे. या संघात अनेक वरिष्ठ खेळाडू नाहीत आणि आयपीएलच्या युवा खेळाडूंना यात स्थान देण्यात आले आहे. यातच टाईम्स ऑफ इंडियाच्या हवाल्याने एक बातमी समोर आली आहे ययात सांगण्यात आलेय की इंग्लंडविरुद्ध सात जुलैपासून होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी तोच संघ खेळणार आहे जो आयर्लंडविरुद्ध दोन सामने खेळणार आहे. 

टीओआयच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या रिपोर्टनुसार सांगितले की भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी एक जुलैपासून ते ५ जुलैपर्यंत बर्मिंगहममध्ये होणार आहे. तर इंग्लंड मालिकेतील पहिला टी-२० सामना केवळ दोन दिवसांनी सात जुलैला साऊथम्पटनमध्ये एजेस बाऊलमध्ये खेळवला जाणार आहे. कसोटी संघात सामील असलेले खेळाडू इतक्या कमी वयात टी-२०साठी तयार होणे सोपे नाही. अशातच आयर्लंडमध्ये दोन टी-२० सामन्यांसाठी निवडलेल्या टीमला त्या लहान मालिकेनंतर इंग्लडला रवाना होण्यास सांगितले जाईल. आयर्लंड दौऱ्यावर जाणारा संघ टी-२० खेळण्याच्या मोडमध्ये असेल. 

अधिक वाचा - ५०० रुपयांपेक्षा २०० रुपयांची नोट आहे महाग

टी-२० आणि वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा अद्याप नाही

भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिका झाल्यावर तीन वनडे सामनेही खेळणार आहे. बीसीसीआयकडून आयर्लंड आणि इंग्लडविरुद्ध कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. पुढील आठवड्यात याची घोषणा होऊ शकते.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी