IND VS SA: पांड्याने दिनेश कार्तिकडून भावाच्या 'त्या' अपमानाचा घेतला बदला?

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 10, 2022 | 15:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

कार्तिक २०व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर कर्णधार ऋषभ पंत बाद झाल्यावर क्रीजवर आला.

pandya
पांड्याने कार्तिकडून भावाच्या 'त्या' अपमानाचा घेतला बदला? 
थोडं पण कामाचं
  • कार्तिक २०व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर कर्णधार ऋषभ पंत बाद झाल्यावर क्रीजवर आला.
  • कार्तिकला नॉर्टजेने पुढील बॉल टाकला. तर कार्तिकलाया बॉलवर धावा घेता आला नाही.
  • मात्र तो या दरम्यान रन आऊट होण्यापासून बचाव झाला. 

मुंबई: टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज दिनेश कार्तिक(dinesh karthik) जेव्हा तीन वर्षांनी मैदानावर परतला तेव्हा संपूर्ण स्टेडियममध्ये डीके...डीके असा आवाज घुमत होता. द. आफ्रिकेविरुद्ध दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात दिनेश कार्तिकने दीर्घकाळाने पुनरागमन केले तेव्हा प्रेक्षक त्याची फलंदाजी पाहण्यास उत्सुक होते. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये असे काही झाले की सोशल मीडिया यूजर्सने हार्दिक पांड्याचा(hardik pandya) क्लास घेतला. Hardik pandya not give strike to dinesh karthik

अधिक वाचा - CCTV Video : वरळीत सी लिंकवर अपघात, टॅक्सीने दोघांना उडवले

कार्तिक २०व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर कर्णधार ऋषभ पंत बाद झाल्यावर क्रीजवर आला. कार्तिकला नॉर्टजेने पुढील बॉल टाकला. तर कार्तिकलाया बॉलवर धावा घेता आला नाही. मात्र तो या दरम्यान रन आऊट होण्यापासून बचाव झाला. 

फील्डरचा थ्रो जर स्टम्प्सवर लागला असता तर कार्तिक बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला होता. चौथ्या बॉलवर पांड्याने सिक्स ठोकला. मात्र पुढील बॉलवर त्याने डीप मिडविकेटच्या दिशेने शॉट खेळला आणि येथे धावा करण्याचा चान्स बनला. मात्र पांड्याने धाव घेण्यास मनाई केली. पांड्याने कार्तिकला स्ट्राईक दिला नाही आणि स्वत: मॅच फिनिश केली. त्याने शेवटच्या बॉलवर २ धावा घेत संघाचा स्कोर २११ धावांवर पोहोचला. 

३ वर्षापूर्वीच्या घटनेशी संबंध

पाहायला गेले तर ही छोटीशी घटना आहे मात्र क्रिकेट चाहते याचा संबंध ३ वर्षापूर्वीच्या घटनेशी जोडत आहेत. २०१९मध्ये न्यूझीलंडविरुद्ध दिनेश कार्तिकने असेच क्रृणाल पांड्यासह बॅटिंग करताना धाव घेण्यास नकार दिला होता. आता हार्दिक पांड्यावर असा आरोप लावत आहेत की त्याने कार्तिककडून आपल्या भावाच्या अपमानाचा बदला घेतला. 

अधिक वाचा - या ४ गोष्टी खाल्ल्याने शुक्राणूंच्या संख्येत होते वाढ

हार्दिकवर भडकले युजर्स

डीकेला स्ट्राईक न दिल्यावरून सोशल मीडियावर युजर्स हार्दिक पांड्यावर भडकले. त्यांचे म्हणणे होते की दिनेश कार्तिकला स्ट्राईक न दिल्यावरून हार्दिक पांड्याने खराब अॅटिट्यूड दाखवला. हार्दिकला सीनियरचा सन्मान करता येत नाही. त्याने स्वत:ला ओव्हरस्मार्ट दाखवण्याचा प्रयत्न केला. पांड्याने दिनेश कार्तिकप्रमाणे निदहास ट्रॉफीमध्ये फिनिश करायचे होते. एका युझरने लिहिले पांड्याने खराब अॅटिट्यूड दाखवला. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी