IND vs NZ: हार्दिक पांड्याबाबत सर्वात मोठी बातमी 

हार्दिक पांड्या न्यूझीलंड विरूद्ध होणाऱ्या दोन टेस्ट मॅचच्या सिरीजीमधून बाहेर झाला आहे. अजूनही हार्दिक पांड्या आपल्या दुखापतीतून पूर्ण बरा झालेला नाही. 

IND vs NZ: हार्दिक पांड्याबाबत सर्वात मोठी बातमी 
hardik pandya ruled out of the test series against new zealand cricket news in marathi tspo 1  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई :  भारताचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्या न्यूझीलंड विरूद्ध होणाऱ्या दोन सामन्याच्या टेस्ट सिरीजमधून बाहेर झाला आहे. हार्दिक राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) मुख्य फिजिओ आशीष कौशिक यांच्यासोबत लंडनला रवाना झाला आहे. या ठिकाणी स्पायनल सर्जन डॉक्टर जेम्स आलीबोन त्याच्या दुखापतीची तपासणी करणार आहेत. न्यूझीलंडमध्ये टेस्ट सिरीज २१ फेब्रुवारीला खेळण्यात येणार आहे. अजून टेस्ट स्कॉडची घोषणा करण्यात आलेली नाही. 

बीसीसीआयने सांगितले की हार्दिक आतापर्यंत संपूर्ण फिटनेस प्राप्त करू शकला नाही. तो जोपर्यंत फिटनेस प्राप्त करत नाही तो पर्यंत तो एनसीएमध्ये रिहॅब करणार आहे. हार्दिक अजूनही आपल्या दुखापतीतून पूर्णपणे बाहेर पडलेला नाही. मुंबईमध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध पहिल्या वन डे सामन्यावेळी टीम मॅनेजमेंटने हार्दिकला सांगितले की त्याने एनसीएमध्ये संपूर्ण रिकव्हरी करावी. 

न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक 

  1. पहिली टेस्ट - वेलिंग्टन - २१ ते २५ फेब्रुवारी 

  2. दुसरी टेस्ट - क्राइस्टचर्च - २९ फेब्रुवारी ते ४ मार्च 

हार्दिक सध्या आपल्यावरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रिहॅबिलिटेशनच्या प्रक्रियेतून जात आहे. आयएएनएस ला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले की, न्यूझीलंड सिरीज दरम्यान भारतीय संघासोबत जोडले जाण्याचा कार्यक्रम आहे. दरम्यान न्यूझीलंड विरूद्ध खेळविण्यात येत असलेल्या टी २० आण वन डे सिरीजसाठी त्याची निवड झाली नव्हती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी