मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने(team india all rounder hardik pandya) आपल्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखला जातो. तो आपल्या खेळासह आपली फॅशन आणि स्टाईलमुळे चर्चेत असतो. हार्दिक पांड्याने नुकतेच इन्स्टाग्राम अकाऊंटवर(instagram account) आपली पत्नी नताशा स्टेनकोविकसह(natasha stankovic) काही फोटोज शेअर केले आहेत. हे फोटोज पाहता पाहता खूप व्हायरल झालेत. Hardik pandya share photos with wife natasha stankovic
अधिक वाचा - छत्रपती संभाजीराजेंनी फडणवीसांकडे केली मोठी मागणी
हार्दिक पांड्या सध्या आपली पत्नी नताशा स्टेनकोविकसह सुट्टयांची मजा घेत ाहेत. पांड्याने जे फोटो शेअर केलेत त्यात हार्दिक शर्टलेस दिसत आहे. तर पत्नी नताशा मोनोकिनीमध्ये दिसत आहे.
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविकच्या फोटोसना युजर्सची मोठी पसंती मिळत आहे. नताशा स्टेनकोविकनेही हार्दिक पांड्याच्या या पोस्टवर कमेंट करत लिहिले, मिस यू. हार्दिक पांड्याने २०२०मध्ये नताशा स्टेनकोविकसोबत लग्न केले होते. नताशा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. नताशा आपल्या हॉटनेस आणि ग्लॅमरसाठी ओळखली जाते. ती सुंदरतेमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींनाही मात देते.
नताशा स्टेनकोविकने सिनेमांत काम केले आहे. ती २०१४च्या बिग बॉसच्या ८व्या हंगामात दिसली होती. नताशाने सत्याग्रह, डॅडी आणि फुकरे रिटर्न्समध्ये काम केले आहे. नताशा स्टेनकोविक तरुणांंमध्ये खूप लोकप्रिय आहे.
हार्दिक पांड्या आता आशिया कप २०२२मध्ये टीम इंडियाकडून खेळताना दिसणार आहे. हार्दिक पांड्या सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. या स्पर्धेत टीम इंडिया आपला पहिला सामना २८ ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.
अधिक वाचा - वजन कमी करण्यासाठी अशा प्रकारे पाळा खाण्याच्या वेळा
हार्दिक पांड्याने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात ४ ओव्हर गोलंदाजी करत त्याने ४.७५च्या इकॉनॉमीने केवळ १९ धावा खर्च केल्या आणि १ विकेट मिळवला. ही विकेट मिळवाना हार्दिक पांड्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या ५० विकेट पूर्ण केल्या. तसेच जबरदस्त रेकॉर्ड आपल्या नावे केला. हार्दिक पांड्या भारताचा असा पहिला खेलाडू बनला आहे ज्याच्या नावावर टी-२० क्रिकेटमध्ये ५००पेक्षा जास्त धावा आहेत आणि ५० विकेट आहेत. हार्दिक ही कामगिरी करणारा जगातील ९वा खेळाडू ठरला आहे.