हार्दिक पांड्याने शेअर केला आपल्या मुलाचा फोटो, सोशल मीडियात पोस्ट व्हायरल

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 01, 2020 | 14:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

Hardik Pandya’s baby boy: भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने आपल्या मुलाचा पहिला पूर्ण फोटो सोशल मीडियात शेअर केला आहे. हार्दिक-नताशा 30 जुलैला मुलाचे आई-बाबा झाले आहेत.

Hardik Pandya with his newborn baby boy
हार्दिक पांड्याने शेअर केला आपल्या मुलाचा पहिला पूर्ण फोटो  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा (Indian cricket team) अष्टपैलू खेळाडू (Allrounder) हार्दिक पांड्यासाठी (Hardik Pandya) 30 जुलैचा दिवस फारच खास ठरला, जेव्हां त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविचने (Natasha Stancovic) मुलाला जन्म दिला. हार्दिक पांड्याने त्यावेळी आपल्या मुलाचे बोट धरलेला फोटो सोशल मीडियावर (social media) शेअर केला होता. आता हार्दिकने आपल्या मुलाचा पूर्ण फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल (viral) झाला आहे.

या फोटोत हार्दिक पांड्याने आपल्या मुलाला उचलून घेतले आहे आणि तो हसत आहे. त्याने हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘देवाचा आशीर्वाद’. ही पोस्ट शेअर केल्यानंतर अर्ध्या तासातच या फोटोला 1 हजारपेक्षाही जास्त रीट्वीट आणि 13 हजारपेक्षा जास्त लाईक्स मिळाले होते. ट्विटर यूजर्स या अष्टपैलू भारतीय खेळाडूचे अभिनंदन करत आहेत.

हार्दिक पांड्याची पोस्ट

गेल्या काही महिन्यांत हार्दिक आणि नताशाने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले. हार्दिक पांड्याने 1 जानेवारी 2020 रोजी नताशासह साखरपुडा केला होता. कोरोनाच्या संकटामुळे देश लॉकडाऊनमध्ये असताना हार्दिक आणि नताशाने देशवासियांना आपल्या पहिल्या मुलाच्या आगमनाची बातमी दिली होती.

हार्दिकने नताशाच्या प्रेग्नन्सीची माहिती सातत्याने सोशल मीडियावर दिली. ते रुग्णालयात जात असतानाही त्यांनी कारमध्ये नताशासोबत घेतलेला सेल्फी पोस्ट करून अपडेट दिली होती. बाळाच्या जन्माआधी हार्दिकने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले होते, ‘लवकरच येत आहे.’

31 मे रोजी नताशाने आपण गर्भवती असल्याची बातमी सोशल मीडियावर देत सुंदर पोस्ट लिहिली होती. या अभिनेत्री/मॉडेलने लिहिले होते, ‘हार्दिक आणि मी आत्तापर्यंत स्मरणीय प्रवास केला आहे आणि आता हा प्रवास आणखी चांगला झाला आहे. आम्ही एकत्र आमच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत. आम्ही आमच्या आयुष्यातील या नव्या पावलाने खूप उत्सुक आहोत आणि आपल्या प्रार्थना आणि आशीर्वाद मागतो आहोत.’

ते असे करतील हे ठाऊक नव्हते

हार्दिक पांड्याच्या वडिलांनी सांगितले की, त्यांचा मुलगा नताशाला प्रपोज करणार असल्याचा त्यांना थोडाही अंदाज नव्हता. हार्दिकने साखरपुड्याच्या दोन दिवस आधी आपल्या भावाला सर्व काही सांगितले होते. हार्दिकने एका मुलाखतीत सांगितले होते, ‘मी साखपुडा करणार असल्याचे माझ्या आई-वडिलांनाही ठाऊक नव्हते. साखरपुड्याच्या दोन दिवस आधी मी क्रुणालला सर्व काही सांगितले होते. मी त्याला म्हटले होते की माझ्याकडे पुरेसे आहे. जिच्यावर माझे प्रेम आहे आणि जिच्यामुळे मी सुधारतो आहे अशी व्यक्ती मी शोधली आहे. मला कुटुंबाची साथ मिळाली आणि त्यांनी मला सांगितले की तुझ्या मनात जे आहे ते कर.’ नताशासोबत झालेल्या आपल्या पहिल्या भेटीबद्दल हार्दिकने सांगितले की अभिनेत्री असलेल्या नताशाला मी कोण आहे हे ठाऊकच नव्हते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी