PHOTO: वेस्ट इंडिजचा दिग्गज किरेन पोलार्डच्या घरी पाहुणा बनून गेला हार्दिक पांड्या

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 05, 2022 | 18:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

Hardik Pandya pays visit to Kieron Pollard's house:टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू हार्दिक पांड्याने किरेन पोलार्डने वेस्ट इंडिजमधील किरेन पोलार्डच्या घरी भेट दिली. 

hardik pandya
किरेन पोलार्डच्या घरी पाहुणा बनून गेला हार्दिक पांड्या 
थोडं पण कामाचं
  • किरेन पोलार्ड आणि हार्दिक पांड्याची भेट
  • वेस्ट इंडिजमध्ये पोलार्डच्या घरी पोहोचला हार्दिक पांड्या
  • मुंबई इंडियन्समध्ये बराच काळ एकत्र खेळत आहेत. 

मुंबई: टीम इंडियाचा धाकड ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने वेस्ट इंडिज दौऱ्याच्या ब्रेकदरम्यान दिग्गज कॅरेबियन क्रिकेटर किरेन पोलार्डच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली या दरम्यान पांड्याने पोलार्डच्या कुटुंबियांचीही भेट घेतली. विशेष म्हणजे हे दोनही क्रिकेटर बराच काळ मुंबई इंडियन्स या संघाकडून आयपीएलमध्ये खेळले आहेत. 

अधिक वाचा - आईने पोटच्या मुलाला फेकले पाचव्या मजल्यावरून

वेस्ट इंडिज दौऱ्यावर सध्याचा टीम इंडियाचा दिग्गज ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने कॅरेबियन ऑलराऊंडर किरेन पोलार्डची भेट घेतली. पांड्याने पोलार्डच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली तसेच त्याच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवला. पांड्या आता आयपीएलमध्ये गुजरात संघाचा कर्णधार आहे. या संघाने मागील आयपीएलचा खिताब जिंकला होता आणि मात्र या दोघांमध्ये मुंबई इंडियन्समध्ये खेळत असल्यापासून मैत्री आहे. 

hardik pandya and kieron pollard

हार्दिक पांड्याने याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात त्याने लिहिले की, किंगच्या घरी जाण्याशिवाय वेस्ट इंडिजचा दौरा कधीच पूर्ण होणार नाही. माझा आवडता पॉली आणि तुमचे सुंदर कुंटुंब, माझ्या सुंदर स्वागतासाठी खूप धन्यवाद. 

kieron pollard hardik pandya

वेस्ट इंडिज दौऱ्यावर टीम इंडियाचा डंका

वेस्ट इंडिज दौऱ्यावर टीम इंडिया जबरदस्त कामगिरी करत आहे. शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय संघाने विंडीज संघाला क्लीन स्वीप दिला. त्यांनी मालिका आपल्या नावे केली. त्यानंतर आता टी-२० मालिकेतही भारत आघाडीवर आहे. ५ सामन्यांच्या मालिकेतील ३ सामने पार पडलेत. त्यात भारतीय संघ २-१ असा आघाडीवर आहे. अद्याप दोन सामने शिल्लक आहेत. दोन्ही सामन्यात भारतीय संघ जबरदस्त कामगिरी करत ही मालिकाही जिंकण्याचा जरूर प्रयत्न करेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी