Movie: '83'  सिनेमात हार्डी संधू बनला मदन लाल, खऱ्या आयुष्यात शिखर धवन आणि ईशांत शर्मासोबत खेळलाय क्रिकेट

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 01, 2021 | 19:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

83 movie, harrdy sandhu, madan lal: हार्डी संधू सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. तो मदन लालची भूमिका साकारताना दिसणार आहे. फार कमी लोकांना माहीत आहे की हार्डी संधूचे क्रिकेटशी असलेले नाते काही नवीन नाही. 

harrdy sandhu
Movie: '83'  सिनेमात हार्डी संधू बनला मदन लाल 
थोडं पण कामाचं
  • '83'सिनेमाचा ट्रेलर रिलीज
  • सिनेमात मदन लालच्या भूमिकेत हार्डी
  • खूप कमी लोकांना याची माहिती असेल की हार्डी संधूचे क्रिकेटशी काही नाते आहे.

मुंबई: बॉलिवूडचा बहु्प्रतिक्षित सिनेमा '83' (movie  '83') चा ट्रेलर रिलीज झाला आहे. यात रणवीर सिंह(ranveer singh) आणि दीपिका पदुकोण(deepika padukone) मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमात रणवीर सिंह, माजी क्रिकेटर आणि भारतीय संघाचे कर्णधार कपिल देव(kapil dev) यांची भूमिका साकारत आहे. सिनेमात सर्व '83' वर्ल्डकप विनिंग क्रिकेटर्सची भूमिका विविध अभिनेत्यांनी साकारली आहे. चाहत्यांना या गोष्टीची उत्सुकता आहे की अखेर कोणता अभिनेता कोणत्या क्रिकेटरची भूमिका साकारत आहे. हार्डी संधू(harrdy sandhu) सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. तो मदन लाल(madan lal) यांची भूमिका साकारत आहे. Harrdy sandhu play madan lal role in movie  '83'

खूप कमी लोकांना याची माहिती असेल की हार्डी संधूचे क्रिकेटशी काही नाते आहे. तो एंटरटेनमेंट जगतातील पहिला क्रिकेटर होता आणि याच स्पोर्ट्समध्ये त्याला करिअर बनवायचे होते. मात्र नशीबाला हे मंजूर नव्हते. 

शिखर धवनसोबत क्रिकेट खेळलाय हार्डी

हार्डी संधूने २०१८मध्ये टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की मी तब्बल १० वर्षे क्रिकेट खेळलो. मी शिखर धवनसोबत अंडर १९ क्रिकेटही खेळलो आहे. तो माझा रूममेट आहे. याशिवाय मी भारतीय क्रिकेट संघातील चेतेश्वर पुजारा आणि इशांत शर्मासोबतही क्रिकेट खेळलो आहे. मात्र २००६मध्ये माझ्या कोपराला दुखापत झाली. मी फास्ट बॉर होतो आणि हाताच्या कोपराला दुखापत होणे बऱ्याच अर्थाने चुकीचे सिद्ध झाले. 

यानंतर हार्डीने क्रिकेट सोडून ऑस्ट्रेलिया जाण्याचा निर्णय घेतला होता आणि तेथे तो कॅब  ड्रायव्हर म्हणून काम करू लागला. मात्र नशीबाने पुन्हा बाजी पलटली आणि काही वेळातच त्याला एंटरटेनमेंट जगात चांगले नाव कमावता आले. मात्र हार्डीसाठी पहिले प्रेम हे नेहमी क्रिकेटच ाराहिले. त्याला वाटलेच नव्हते की क्रिकेटशिवाय तो इतर कोणत्या फिल्डमध्ये आपले नाव कमवू शकेल. अभिनेत्याने पुढे सांगितले, त्या दरम्यान आयपीएल स्पर्धा सुरू झाली होती आणि माझ्यापेक्षा जे ज्युनियर होते त्यांची निवड होत होती. मला खूप वाईट वाटत होते. मात्र नशीबाला ाहीतरी वेगळे मंजूर होते. मी आयपीएल खेळू शकत होतो. मी हार मानली असेही नव्हते. मी पुन्हा ट्रेनिंग सुरू केली आणि पुन्हा रणजी ट्रॉफीमध्ये संधी मिळाली. मात्र सामन्याच्या तीन दिवस आधी मला पुन्हा तिथेच दुखापत झाली. हा अपघात माझ्यासाठी भावनात्मक खूपच त्रासदायक होता. यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेलो आणि अनेक आठवडे रूममधून बाहेर आलो नाही. 

कोचना वाटत होते की टीम इंडियामध्ये खेळावे

हार्डीने एका मुलाखतीत सांगितले होते की, आधी मला गाण्यामध्ये कोणताही रस नव्हता. मात्र माझ्याकडे पर्यायही नव्हते. २०१०मध्ये मी संगीत शिकण्यास सुरूवात केली. २०१२मध्ये माझा पहिला अल्बम रिलीज झाला. अनेकदा मला भारतासाठी न खेळल्याचा पश्चाताप होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी