IND vs PAK:रिझवानने मैदानावर हिंदूसमोर नमाज पठण केले...वकार युनिसच्या विधानावर हर्षा भोगलेने दिले उत्तर

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 27, 2021 | 13:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mohammad Rizwan Namaz Controversy: मोहम्मद रिझवानने भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान नमाज पठण केले यावरून वकार युनिसचे विधान आले ज्यावरून हर्षा भोगलेने आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

waqar-bhogle
IND vs PAK: वकार युनिसच्या विधानावर हर्षा भोगलेचे उत्तर 
थोडं पण कामाचं
  • भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर वकार युनिसचे विधान
  • वकार युनिसनने मोहम्मद रिझवानबाबत केले होते विधान
  • वकारच्या विधानावर हर्षा भोगलेने दिली प्रतिक्रिया

मुंबई: भारत-पाकिस्तान(india-pakistan) यांच्यात खेळवण्यात आलेल्या टी-२० वर्ल्डकप २०२१(t-20 world cup 2021) सामन्यात पाकिस्तानी संघाचा सलामीवीर मोहम्मद रिझवानने(opener mohammad rizwan) शानदार अर्धशतकी खेळी केली. त्याने नाबाद ७९ धावांची खेळी केली आणि बाबर आझमसोबत(babar azam) मिळून संघाला १० विकेटनी विजय मिळवून दिला. भारताविरुद्ध २९वर्षाच्या इतिहासात पाकिस्तानचा हा वर्ल्डकपमधील पहिलाच विजय होता. या विजयानंतर विविध बातम्या येऊ लागल्या आहेत तसेच वाद होत आहेत. त्यातच ताजा वाद मोहम्मद रिझवानवरून सुरू झाला आहे. यावर वकार युनिसच्या एका विधानावर हर्षा भोगलेने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. Harsha bhogle reaction on waqar younis statment about rizwan 

मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानचा माजी वेगवन गोलंदाज आणि प्रशिक्षक वकार युनिसने एका विधानात म्हटले की मोहम्मद रिझवानला हिंदूंसमोर नमाज पठण करताना पाहणे हे त्यांच्यासाठी खास आहे. त्याच्या या विधानंतर अनेक प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आणि पाहता पाहता भारताचे प्रसिद्ध क्रिकेट कमेंटेटर हर्षा भोगलेची यावर प्रतिक्रिया आली. 

हर्षा भोगलेने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की वकार युनिससारख्या उच्च पदस्थ व्यक्तीने असे विधान करणे की हिंदूंसमोर रिझवान नमाज पठण करताना पाहणे त्याच्यासाठी खास होते म्हणजे निराशाजनक बाब आह. आमच्यापैकी अनेक जण खूप प्रयत्न करत असतात की अशा गोष्टींना महत्त्व दिले जाऊ नये आणि केवळ खेळाबाबतच बातचीत व्हावी. अशातच हे असे ऐकणे म्हणजे नक्कीच निराशाजनक आहे. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या टी-२० वर्ल्डकप सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. दुबईच्या मैदानावर पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने २० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावताना १५१ धावा केल्या. यात कर्णधार कोहलीने शानदार अर्धशतक ठोकले. प्रत्त्युत्तरासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानी संघाने हे आव्हान १७.५ ओव्हरमध्ये कोणतीही विकेट न गमावता पूर्ण केले. 


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी