गांजा ओढताना पकडला गेला होता हा क्रिकेटर, ६ बॉलवर ठोकले होते ६ सिक्स

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 01, 2021 | 18:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

हर्षेल गिब्ज आपल्या करिअरदरम्यान अनेक विविध वादांमुळे चर्चेच्या भोवऱ्यात राहिला. २००१मध्ये हर्षेल गिब्ज अँटिगाच्या जॉली बीच रिसॉर्टमधील एका रूममध्ये गांजा ओढताना पकडला गेला होता. 

cricket
गांजा ओढताना पकडला गेला हा क्रिकेटर, ६ बॉलवर ठोकले ६ सिक्स 

थोडं पण कामाचं

  • गांजा ओढताना पकडला गेला होता हर्षेल गिब्ज
  • स्मिथही या मैफीलचा भाग होता
  • दारूच्या नशेत ठोकले होते १७५ रन्स

मुंबई: वर्ष २००१मद्ये शॉन पोलॉकच्या(shaun pollock) नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा(south africa team) संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर कसोटी आणि वनडे सामने खेळण्यासाठी गेली होती. ११ मेच्या रात्री हर्षेल गिब्ज(herschelle gibbs) अँटिगामध्ये गांजा ओढताना पकडला गेला होता. हर्षेल गिब्जसह त्याचे सहकारी खेळाडू रोजर टेलेमाकस, पॉल अॅडम्स, जस्टिन कँप आणि आंद्रे नेल यांचाही समावेश होता. इतकंच नव्हे तर या खेळाडूंसोबत दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या कोचिंग सदस्याचाही समावेश होता. 

स्मिथही या मैफीलचा भाग होता

दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे तत्कालीन फिजिओ क्रेग स्मिथ हे ही या मैफीलचा भाग होते. यानंतर क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने हर्षेल गिब्जसह संघातील सर्व सदस्यांवर कडक कारवाई करत त्यांच्यावर १० हजार दक्षिण आफ्रिकन रेंड इतका दंड ठोठावला होता. हर्षेल गिब्ज फिक्सिंगच्या जाळ्यातही अडकला होता. २०००मध्ये हर्षेल गिब्जला ६ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते. 

दारूच्या नशेत ठोकल्या होत्या १७५ धावा

हर्षेल गिब्जने दारूच्या नशेत १२ मार्च २००६मध्ये जोहान्सबर्च्या वाँडरर्स स्टेडिययमध्ये इतिहास रचला होता. आफ्रिकेच्या संघाने वनडे इतिहासात सर्वाधिक मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता. ज्यामुळे क्रिकेट चाहते आश्चर्यचकित झाले होते. पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ४३४ धावा केल्या होत्या. त्यावेळचा हा सर्वाधिक स्कोर होता. त्यावेळी कोणी विचारही केला नसेल की इतका मोठा स्कोर असतानाही एखादा संघ पराभूत होऊ शकतो. 

नशेमध्ये केली होती मोठी खेळी

दक्षिण आफ्रिकेच्या या विजयाचा हिरो हर्षेल गिब्ज होता. त्याने १११ चेंडूत १७५ धावा ठोकल्या होत्या. त्याने आपल्या खेळीत २१ चौकार आणि ७ षटकार ठोकले होते. खुद्द गिब्जने याचा खुलासा केला की तो दारूच्या नशेत होता. गिब्सने ऑटोबायोग्राफी 'टू द पॉइंट : द नो होल्ड्स बार्ड' (To the point: The no-holds-barred)मध्ये सांगितले की सामन्याच्या आधीच्या रात्री त्याने खूप दारू प्यायली होती आणि सामन्याच्या दिवशी त्याच्यावरील हँगओव्हर कायम होता. 

६ चेंडूवर ६ सिक्स

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर माईक हसीने आपल्या पुस्तकात यााबतचा खुलासा केला आहे. त्याने लिहिले की झोपण्याआधी मी आपल्या हॉटेलच्या रूमबाहेर पाहिले की गिब्ज अजूनही तेथेच आहे. गिब्ज सकाळी नाश्ता करण्यासाठी आला होता. तेव्हाही तो नशेत होता. हर्षेल गिब्जचे करिअर १५ वर्षे चालले. तो एकमेव क्रिकेटर आहे ज्याने वनडे क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये सलग ६ सिक्स लगावले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी