मुंबई: क्रिकेटर विराट कोहलीने सोशल मीडियावर पहिल्यांदा आपली मुलगी वामिकाचा फोटो शेअर केला होता. या फोटोत त्याने वामिकाचा आई अनुष्काशी खेळतानाचा फोटो शेअर केला होता. यात ती आपल्या आईसोबत खेळत होती. हा फोटो शेअर करत त्याने महिला दिनाच्या खास शुभेच्छाही दिल्या होत्या.
मुलगी आणि पत्नीचा फोटो शेअर करत विराटने लिहिले की, एका बाळाला जन्म घेताना पाहणे हे मनुष्यासाठी अविश्वसनीय आणि आश्चर्यजनक अनुभव असू शकतो. याचा साक्षीदार झाल्यानंतर तुम्ही महिलांची खरी ताकद आणि दिव्यता समजू शकता. देवाने त्यांच्यातच आणखी एका जीवाला कसे बनवले असेल. याच कारणामुळे ती पुरुषांच्या तुलनेत अधिक मजबूत आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात मजबूत आणि दयाळु महिला आणि दुसरी जी आपल्या आईसारखी आहे, या दोघींना महिला दिनाच्या शुभेच्छा.
याआधी १ फेब्रुवारीला अनुष्काने आपली मुलगी वामिकाचा फोटो शेअर केला होता. फोटोमध्ये अनुष्कासोबत तिचा पती विराट आणि वामिका दोघीही दिसत होत्या. हा फोटो शेअर करत त्यांनी आपल्या मुलीच्या नावाचाही खुलासा केला होता. तसेच लिहिले होते की, आम्ही एकत्र प्रेमाने राहतो मात्र आता छोट्या वामिकाने हे प्रेम वेगळ्या स्तरावर नेले आहे. अश्रू, हसू, त्रास, आनंद सगळं काही एका मिनिटामध्ये अनुभवत आहोत. झोपेची कमतरता आहे मात्र आम्ही खुश आहोत.
वामिकाचा जन्म ११ जानेवारी २०२१ला झाला होता. विराट कोहलीने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना ही खुशखबर दिली होती. विराट आणि अनुष्काचे लग्न २०१७मध्ये इटली येथील लेक कोमोमध्ये झाले होते.