Rahul Dravid Corona Positive: राहुल द्रविड कोरोना पॉझिटिव्ह, आशिया चषकापूर्वी भारताला धक्का

Rahul Dravid Corona Positive: आशिया चषक-2022 या आठवड्यापासून सुरू होणार आहे. पण या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला कोरोनाची लागण झाली आहे.

head coach rahul dravid corona positive shock to india before asia cup
द्रविड कोरोना पॉझिटिव्ह, आशिया चषकापूर्वी भारताला धक्का  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • आशिया चषक स्पर्धेपूर्वी भारताला मोठा धक्का
  • टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला कोरोनाची लागण
  • राहुल द्रविडऐवजी व्हीव्हीएस लक्ष्मण कोच म्हणून संघासोबत जाण्याची शक्यता

Asia Cup: आशिया चषकापूर्वी टीम इंडियाला (Team India) मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) कोरोना पॉझिटिव्ह  (Corona Positive)आला असून, तो आशिया चषक स्पर्धेत जाऊ शकेल की नाही याबाबत अजूनही शंका आहे. टीम इंडिया आज (२३ ऑगस्ट) यूएईला (UAE) रवाना होणार आहे. आशिया चषक या शनिवारपासून म्हणजेच २७ ऑगस्टपासून सुरू होत असून भारताचा पहिला सामना हा २८ तारखेला होणार आहे.

नुकत्याच संपलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हा काही दिवस ब्रेकवर होता. एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वेला पोहोचलेल्या केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाचे प्रशिक्षक म्हणून राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण होते. केएल राहुलच्या नेतृत्वा टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेत ३-० असा दणदणीत विजय मिळवला.

अधिक वाचा: Team india captain: १२ कर्णधारांच्या नेतृत्वात खेळलाय हा भारतीय क्रिकेटर, नाव ऐकून व्हाल हैराण

२७ ऑगस्टपासून यूएईमध्ये आशिया कपला सुरुवात होणार आहे. तर २८ ऑगस्ट रोजी भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार आहे (Ind vs Pak). भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे.

आशिया कपमध्ये द्रविड दिसणार नाही?

टीम इंडियासाठी कठीण गोष्ट म्हणजे राहुल द्रविड आता कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे आणि अशा परिस्थितीत आशिया कपमध्ये टीम इंडियासोबत उपस्थित राहणे त्याच्यासाठी खूप कठीण आहे. कारण जोपर्यंत तो कोरोना निगेटिव्ह होत नाही आणि त्यानंतर तो फिट होत नाही तोपर्यंत तो संघासोबत जाऊ शकणार नाही. अशा स्थितीत आशिया कपमध्ये राहुल द्रविडऐवजी व्हीव्हीएस लक्ष्मण संघासोबत कोच म्हणून जाण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा: IND vs WI: शेवटच्या क्षणापर्यंत रोखला होता श्वास, मग घडलं असं काहीसं

आशिया कपसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुडा, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.

स्टँडबाय: श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चहर

द्रविड हा सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक 

राहुल द्रविडची गणना भारताच्या सर्वकालीन महान खेळाडूंमध्ये केली जाते. टीम इंडियाचा माजी कर्णधार असलेल्या राहुल द्रविडने देशासाठी १६४ कसोटी सामने खेळले असून त्यात त्याच्या नावावर १३२८८ धावा आहेत. राहुल द्रविडची कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीची सरासरी ५२.३१ आहे. त्याच वेळी, एकदिवसीय क्रिकेटमध्ये देखील, त्याने ३४४ सामन्यांमध्ये १०८८९ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सरासरी ४० च्या आसपास आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी